महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राकसकोप पूर्ण भरण्यास केवळ 5 फूट पाण्याची गरज

11:46 AM Jul 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रविवारी दिवसभरातील पावसामुळे पाणीपातळीत एक फुटाने वाढ : जुनी पाणीपातळी पूर्ण

Advertisement

वार्ताहर / तुडये

Advertisement

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाने रविवारी सायंकाळी आपली जुनी पाणीपातळी पूर्ण केली आहे. रविवारी दिवसभरातील पावसामुळे सकाळच्या 2469.00 पाणीपातळीत एक फुटाने वाढ झाली. सायंकाळी 6 वाजता पाणीपातळी 2470 फुटावर पोहोचली आहे. जलाशयाची पूर्ण क्षमतेची पाणीपातळी पूर्ण होण्यास आता केवळ 5 फूट पाण्याची आवश्यकता आहे.

रविवारी सकाळी जलाशय परिसरातील पावसाची नोंद 19.0 मि. मी. इतकी झाली. या वर्षीचा एकूण पाऊस 888.7 मि. मी. झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी पाणीपातळी 2449.70 फूट तर एकूण पाऊस 503.1 मि. मी. झाला होता. मागील वर्षापेक्षा पाणीपातळी ही 19.30 फुटाने जादा आहे. तर 385.6 मि. मी. पाऊस जादा झाला आहे.

जुलै महिन्याच्या 14 दिवसांत या परिसरात दमदार पावसाने साथ दिली आहे. या 14 दिवसांत 489.8 मि. मी. पाऊस झाला आहे. तर याच कालावधीत एकूण 17.20 फूट पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. डेडस्टॉक नंतरचा एकूण 23 फूट पाणीसाठा जलाशयात उपलब्ध झाला आहे.

जलाशयाची जुनी पाणीपातळी पूर्ण

1962 साली उभारण्यात आलेल्या या जलाशयाची पाणीपातळी 2470 फुटाची होती. बेळगाव शहर आणि उपनगरातील मोठ्या वाढीमुळे पाण्याची मागणी वाढली. संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी बेळगाव शहर पाणीपुरवठा मंडळाने जलाशयातून विसर्ग होणाऱ्या मार्कंडेय नदीला वेस्टवेअरचे सहा दरवाजे उभारत सन 1984 साली गेटची उभारणी केली. यामुळे अतिरिक्त 5 फूट पाण्याची वाढ होत पाणीपातळी 2475 फूट करण्यात आली. त्यापूर्वी 1978 सालापासून 1984 सालापर्यंत विसर्ग होणाऱ्या मार्कंडेय नदी पात्रात सिमेंटच्या रिकाम्या पोत्यातून माती भरुन ते बसवत पाणीसाठा हा 3 फुटाने वाढविण्याचा प्रकारही पाणीपुरवठा मंडळाने केला होता. रविवारी सायंकाळी 6 वाजता जलाशयाने जुनी पातळी पूर्ण केली. जलाशयाची पूर्ण क्षमतेने भरण्याची पाणीपातळी ही 2475 फूट असून एकूण 29 फूट पाणीसाठा होतो.

पाणीपातळीत झालेली वाढ खालीलप्रमाणे

दिनांक झालेला पाऊस एकूण पाऊस सध्याची पाणीपातळी मागील वर्षाची पाणीपातळी

09/07/24 20.7 मिमी 820.0 मिमी 2465.70 फूट 2448.25 फूट

10/07/24 4.8 मिमी 824.8 मिमी 2466.50 फूट 2448.55 फूट

11/07/24 13.6 मिमी 838.4 मिमी 2467.40 फूट 2448.70 फूट

12/07/24 4.1 मिमी 842.5 मिमी 2467.80 फूट 2448.85 फूट

13/07/24 27.2 मिमी 869.7 मिमी 2468.40 फूट 2449.20 फूट

14/07/24 19.0 मिमी 888.7 मिमी 2469.0 फूट 2449.70 फूट

रविवारी सायंकाळी 2470 फूट जूनी पाणी पातळी पूर्ण

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article