For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विशेष म्युटेशन शिबिरात केवळ 216 अर्ज निकाली

02:54 PM Apr 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
विशेष म्युटेशन शिबिरात केवळ 216 अर्ज निकाली
Advertisement

उत्तर गोव्यात दोन हजारपेक्षा अधिक अर्ज प्रलंबित

Advertisement

पणजी : उत्तर गोव्यातील विविध तालुक्यात दोन दिवस झालेल्या विशेष म्युटेशन शिबिरांतून 216 अर्ज निकालात काढण्यात सरकारला यश मिळाले आहे. उत्तर गोवा जिल्ह्यात मिळून एकूण 2000 पेक्षा जास्त म्युटेशनाचे अर्ज प्रलंबित आहे. प्रलंबित अर्ज निकालात काढावेत यासाठी सत्तरी, डिचोली, बार्देश, पेडणे व तिसवाडी या पाच तालुक्यात विशेष म्युटेशन शिबिरे घेण्यात आली. त्यात चांगला प्रतिसादही लाभला. तथापि जास्तीतजास्त अर्ज निकालात काढणे शक्य झाले नाही आणि विशेष म्युटेशन शिबिराचा उद्देशही फारसा सफल झाला नसल्याचे दिसून आले.

उत्तर गोव्यातील मामलेदार व उपजिल्हाधिकारी अशा सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना श्रीलईराई जत्रेच्या व्यवस्थापनाचे काम देण्यात आले होते. त्यामुळे ते पूर्णपणे म्युटेशनवर लक्ष केंद्रीत करू शकले नाही. सर्व अर्जांवर त्यांना लक्ष देता आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. डिचोलीतील सर्व प्रमुख सरकारी अधिकारी लईराई जत्रेच्या आयोजनात गुंतल्याने त्या तालुक्यातील अर्ज निकालात काढणे शक्य झाले नाही. मामलेदार, उपजिल्हाधिकारी लईराई जत्रेच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात व्यस्त राहिले. त्यामुळे म्युटेशन शिबिर व त्यांचे अर्ज याकडे पूर्णपणे लक्ष देणे त्यांनी शक्य झाले नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.