पृथ्वीवर राहणार केवळ 10 कोटी लोक
तज्ञाने केला अजब दावा
जागतिक लोकसंख्येवरून अनेकदा अध्ययनं होत असतात. लोकसंख्या कशाप्रकारे वेगाने वाढली आणि मग त्यात स्थिरता आली हे अभ्यासिले जात असते. परंतु एका तज्ञाने केलेला दावा चकित करणारा आहे. सध्या जगाची लोकसंख्या 800 कोटी असून 2300 पर्यंत ही संख्या वेगाने कमी होत केवळ 10 कोटीच राहणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
तर अन्य अनेक संशोधनांमध्ये देखील 2100 पर्यंत जगाच्या लोकसंख्येत मोठी घसरण दिसून येणार असल्याचे म्हटले गेले आहे. 2050 नंतर जागतिक लोकसंख्येत स्थिरतेची स्थिती निर्माण होईल आणि मग पुढील 50 वर्षांमध्ये यात घट होण्यास सुरुवात होणार आहे. जागतिक लोकसंख्येत ही घसरण अत्यंत वेगाने होईल आणि 2300 पर्यंत केवळ 10 कोटी लोकच राहतील असे टेक एक्सपर्ट सुभाष काक यांचे सांगणे आहे. याचे कारण आर्टिफिशियल इंटेलिजेन्स देखील ठरणार आहे. याच्या मदतीने लोक अनेक कामे पूर्ण करतील आणि अखेरीस जन्मदर देखील याचमुळे कमी होत जाणार आहे. लोकसंख्येतील ही घसरण कुठल्याही आण्विक हल्ल्यामुळे होणार नाही. तर याचे कारण आमच्या नोकऱ्यांमध्ये कुणी एआयद्वारे रिप्लेस करणार असल्याचा दावा ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीत कॉम्प्युटर सायन्स शिकविणारे सुभाष काक यांनी केला आहे.
हा प्रकार समाज आणि जगासाठी अत्यंत धोकादायक असू शकतो. पुढे कोणता मार्ग आहे हे सध्या लोकांना माहित नाही. कॉम्प्युटर आणि रोबोट भले संवेदनशील नसतील, परंतु आम्ही जे काही काम करत आहोत, त्याची जागा एआय घेऊ शकतो हे सत्य आहे. ऐज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजेन्स या पुस्तकाच्या लेखकाने भविष्यात जन्मदर कमी होणार असल्याचे म्हटले आहे.
अधिक मूलं जन्माला येऊ नयेत अशी लोकांची इच्छा असेल, कारण बेरोजगारीचा धोका राहणार आहे. लोकांनी अपत्यांना जन्म दिला नाही तर लोकसंख्येत तीव्र घसरण होईल. जागतिक लोकसंख्येत अचानक घट होईल. पूर्ण ग्रहावर लोकसंख्या केवळ 100 दशलक्ष म्हणजेच 10 कोटीच असेल असे काक यांनी म्हटले. हा अनुमान 2300 किंवा 2380 सालासाठी जाहीर करण्यात आला आहे.