For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑनलाईन पासपोर्ट पोर्टल 5 दिवसांसाठी बंद

07:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑनलाईन पासपोर्ट पोर्टल 5 दिवसांसाठी बंद
Advertisement

सर्व अपॉइंटमेंट पुन्हा ठरविल्या जाणार

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

ऑनलाईन पासपोर्ट पोर्टलवर पुढील 5 दिवसांपर्यंत कुठलेच काम होणार नाही. यादरम्यान जारी करण्यात आलेल्या सर्व अपॉइंटमेंट पुन्हा निश्चित केल्या जाणार आहेत. पासपोर्ट अर्जांसाठी ऑनलाईन पोर्टल देखभाल प्रक्रियेमुळे पुढील 5 दिवसांसाठी बंद राहणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. या कालावधीत कुठलीही नवी अपॉइंटमेंट शेड्यूल करण्यात येणार नाही. याचबरोबर पूर्वीच आरक्षित करण्यात आलेली अपॉइंटमेंट पुन्हा शेड्यूल करण्यात येणार आहे.

Advertisement

पासपोर्ट सेवा पोर्टल 29 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजल्यापासून 2 सप्टेंबर सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत तांत्रिक देखभालीसाठी बंद राहणार आहे. नागरिक आणि सर्व एमईएम/ आरपीओ/ बीओआय/ आयएसपी/ डीओपी/ पोलीस अधिकाऱ्यांसाठी सिस्टीम उपलब्ध नसणार आहे. 30 ऑगस्टपूर्वी बुक करण्यात आलेल्या अपॉइंटमेंटला पुन्हा ठरविले जाणार आहे. याची कल्पना अर्जदारांना योग्यवेळी देण्यात येईल असे जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद आहे.

ही एक सामान्य आणि नियमित प्रक्रिया आहे. अपॉइंटमेंटला पुन्हा ठरविण्यासाठी आमच्याकडे नेहमीच पर्यायी योजना असते. सार्वजनिक केंद्रीत सेवेसाठी देखभालीसाठी योजना नेहमीच पूर्वीच ठरविण्यात आलेली असते, जेणेकरून जनतेला त्रास होऊ नये. याचमुळे अपॉइंटमेंट पुन्हा ठरविण्यात कुठलीच समस्या येणार नसल्याचे विदेश मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

पासपोर्ट सेवा पोर्टलचे कामकाज

पासपोर्ट सेवा पोर्टलद्वारे नव्या पासपोर्टसाठी अर्ज करणे किंवा पासपोर्टचे नूतनीकरण केले जाते. यावर देशभरातील केंद्रांवर अपॉइंटमेंट बुक केल्या जातात. अर्ज केल्यावरच अपॉइंटमेंट मिळत असते. ज्या दिवसाची अपॉइंटमेंट असते, त्या दिवशी अर्जदाराला पासपोर्ट केंद्रांवर पोहोचावे लागते. तेथे पडताळणीसाठी स्वत:चे दस्तऐवज सादर करावे लागतात. त्यानंतर पोलीस पडताळणी होते आणि मग पासपोर्ट अर्जदाराच्या पत्त्यावर पोहोचतो. अर्जदार नियमित मोडचा पर्याय निवडू शकतो, ज्यात पासपोर्ट 30-45 दिवसांमध्ये अर्जदारांपर्यंत पोहोचतो. याचबरोबर तत्काळ मोडचा पर्याय असतो, ज्यात काही दिवसांमध्येच अर्जदाराला पासपोर्ट मिळत असतो.

Advertisement
Tags :

.