आसगांवात ऑनलाईन जुगाराचा पर्दाफाश
बारा बिगरगोमंतकीयांना अटक : 7 लॅपटॉप, 8 मोबाईल जप्त,हणजूण पोलिसांची कारवाई
म्हापसा : आसगांव येथील एका रिसॉर्टमध्ये छापा टाकून हणजूण पोलिसांनी बेकायदा चाललेल्या ऑनलाईन जुगाराचा पर्दाफाश केला. ही कारवाई गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. बुधवारी सकाळी केलेल्या या कारवाईत संशयितांच्या ताब्यातील तीन लाख पन्नास हजार रूपयांची रोकड जप्त करण्यात आली असून बारा जणांना रितसर अटक करण्यात आली आहे.
हणजूण पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये अस्लम हकीम महम्मद (भिलवाडा -राजस्थान), महम्मद मुस्ताक हुसैन (23-चितौडगड-राजस्थान), वासिम शाहजांह महम्मद (उदयपुर -राजस्थान), आयर्न अली बुखारी (चितौडगड राजस्थान), अझान इरफान नागोरी (रहिमपुरा-गुजरात), वाहोरा महम्मद अब्दुल करीम (गुजरात), वाहोराम सलीमभाई (गुजरात), मेहॉन अल्फाज अब्दुल रशीद (गांधीनगर -गुजरात), पठाण गुलशान खान (बरोडा-गुजरात), महम्मद अफझल खान (चितौडगड -राजस्थान), महम्मद इनायत शाह (चितौडगड-राजस्थान), शराफत खान भिस्ती (चितौडगड-राजस्थान) यांचा समावेश आहे. पोलिसांनी 7 लॅपटॉप तसेच 8 महागडे मोबाईल फोन ताब्यात घेतले आहेत.