ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यास ठाण्यातून अटक
रत्नागिरी :
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 14 लाख 28 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयिताला खेड पोलिसांकडून ठाणे येथून अटक करण्यात आल़ी शशिकांत विठ्ठल मिरजकर (रा. भाईदर ईस्ट जि. ठाणे) असे संशयिताचे नाव आह़े त्याला न्यायालयापुढे हजर केले असता 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल़ी
तक्रारदार यांना संशयिताने फोन करून तुम्ही तुमचे पैसे माझ्याकडे गुंतवणूक करा तुम्हाला जास्तीतजास्त रकमेचा परतावा देण्यात येईल असे आमिष दाखविले होत़े या अमिषाला बळी पडून तक्रारदार यांनी 2019 ते 2023 या कालावधीत 14 लाख 28 गुंतवणूक केली होत़ी दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी ऑनलाईन फसवणूक केली म्हणून खेड पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान अधि 66 (क), 66 (4) प्रमाणे गुन्हा दाखल केला होत़ा सदर गुन्ह्यातील संशयिताचा तांत्रिक गोष्टीवरून व बँकेच्या माहितीच्या आधारे शोध घेत असताना सदर संशयित हा नवघर, मिरा भाईंदर जि. ठाणे येथे असल्याचे तपासात निष्पन्न झालेले होते. सदर कामगिरी पोलीस निरीक्षक नितीन भोयर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, हवालदार दीपक गोरे, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश जोगी, वैभव ओहोळ, राम नागुलवार. टेक्नीकल अॅनालेसिस ब्रांच मधील हवालदार रमिज शेख यांनी केलेली आहे.