कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

साडेनऊ लाखांचा ऑनलाईन गंडा

12:29 PM Nov 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पैसा गुंतविल्यानंतर परतावाही मिळाला झटपट : जादा पैसे मिळण्याच्या आमिषाने फसवणूक

Advertisement

बेळगाव : सध्या सोन्याचा भाव वाढला आहे. आपल्या ओरिओनेक्स मार्केट्समध्ये पैसे गुंतवल्यास अधिक पैसा मिळेल, असे सांगून भामट्यांनी बैलहोंगल येथील एका इसमाला ऑनलाईनद्वारे 9 लाख 23 हजार 948 रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सोमवार दि. 3 रोजी जिल्हा सीईएन पोलीस स्थानकात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. प्रवीण अनंत रेणिके रा. बैलहोंगल यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्रवीण यांची बैलहोंगल येथील युनियन बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँकेत खाती आहेत.

Advertisement

बँकेच्या खात्याशी लिंक असलेल्या त्यांच्या मोबाईल क्रमांकावर 13 ऑक्टोबर रोजी एका मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर मेसेज आला. सध्या सोन्याचा भाव वाढला आहे. आपल्या ओरिओनेक्स मार्केट्स कंपनीत पैसे गुंतविल्यास अधिक पैसा मिळू शकतो, असे सांगून एक लिंक पाठविण्यात आली. फिर्यादीने लिंकवर क्लिक करताच कंपनीशी संबंधित पेज ओपन झाले. फिर्यादीने त्यामध्ये लॉगईन होऊन आपले नाव, जन्म तारीख, त्याचबरोबर आधारकार्ड जोडले. त्यानंतर ओरिओनेक्स मार्केट्स पेजवर फिर्यादीच्या नावाने एक खाते ओपन झाले.

त्यानंतर व्हॉटस्अॅपवर पैसे गुंतविण्यासंदर्भात माहितीची देवाणघेवाण झाली. फिर्यादीने युपीआयच्या माध्यमातून 13 ऑक्टोबर रोजी 44 हजार 352 रुपये फोन पे केले. त्याचदिवशी व्हॉटसअॅपवर 4 हजार 435 रुपये कोणत्या खात्यावर जमा करू अशी विचारणा भामट्यांनी केली. त्यानंतर फिर्यादीने आपल्या कॅनरा खात्यासंबंधी माहिती दिली. काही क्षणातच त्या खात्यावर 4 हजार 435 रुपये जमा करण्यात आले. पैसा गुंतविल्यानंतर त्याचा परतावाही झटपट मिळाल्याने आपण जास्त पैसे मिळवू शकतो, या आशेपोटी फिर्यादीने तब्बल 9 लाख 23 हजार 948 रुपये ऑनलाईनच्या माध्यमातून गुंतविले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्याने या प्रकरणी जिल्हा सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.  पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article