For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांगोल्डा, तिसवाडीत ऑनलाईन सट्टेबाजीवर छापेमारी

03:05 PM Apr 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
सांगोल्डा  तिसवाडीत ऑनलाईन सट्टेबाजीवर छापेमारी
Advertisement

16 जणांना अटक : लाखो रुपयांचे साहित्य जप्त

Advertisement

पणजी : सायबर गुन्हे विरोधी विभागाने तिसवाडी तालुक्यातील दोन ठिकाणांसह सांगोल्डा येथे कारवाई करून ऑनलाईन आयपीएल सट्टेबाजी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. सांगोल्डा येथे ऑनलाईन सट्टेबाजी करताना सहाजणांना रंगेहात अटक केली आहे, तर तिसवाडीतील दोन्ही ठिकाणांवरुन मिळून दहा जणांना अटक करण्यात आली आहे. सांगोल्डा येथे सट्टेबाजांकडून 31 हजार रोख रक्कम तसेच एटीएम कार्ड, मोबाईल फोन, सहा लॅपटॉप व अन्य डिजिटल साहित्य मिळून एकूण 10 लाख ऊपये किंमतीचे साहित्य जप्त केले आहे. सर्व संशयितांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66-सी सह भारतीय न्याय संहिता कलम 3(5) आणि गोवा पोलिस जुगार कायद्याच्या कलम 3 व 4 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सहा सट्टेबाजांना अटक

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्यांमध्ये गेडीया राज दिलीपभाई, (सुरत, गुजरात) भीमराज मीना हीरा (उदयपूर, राजस्थान), नीलेश रतीभाई हिरानी (सुरत, गुजरात), शनी दीपकभाई चावडा (सुरत, गुजरात), यश जयसुखभाई (अमरेली गुजरात) आणि प्रशांत हरीश त्रिवेदी (वर्धमान, पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. सायबर विभागाचे अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या देखरेखीखाली निरीक्षक दीपक पेडणेकर, उपनिरीक्षक नवीन नाईक, हवालदार योगेश खांडेपारकर, कॉन्स्टेबल करोल इब्राहिम, अक्षय वर्लेकर, संयोग शेट्यो यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणाचा सायबर विभाग पुढील तपास करीत आहेत.

तिसवाडी छापेमारी 10 जणांना अटक

तिसवाडी तालुक्यात दोन ठिकाणी सुऊ असलेल्या आयपीएल सट्टेबाजी विरोधात गुन्हा शाखेने कारवाई करून  10 जणांना अटक केली आहे. रोख रकमेसह अंदाजे 40 लाख ऊपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयिता विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 319 (2) सहवाचन 3 (5) आणि आयटी कायद्याच्या कलम 66-सी व जुगार कायद्याच्या कलम 3, 4 अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितामध्ये दिग्विजय योवंज देवंगन (29, छत्तीसगड), मनीष सोहानियाल सुरहोता (21, हरियाणा), समीर रा. श्यामलाल (20, हरियाणा), गौतम रा. जगपाल सिंग परितुर (28, उत्तर प्रदेश), ध्रुव स. विजय सियाववानी (20 मध्य प्रदेश), कमलसिंग सो बिरायण (22,छत्तीसगड), भूपेंद्र सिंग (20 छत्तीसगड), करण चौहान (20, उत्तर प्रदेश), लकी संतोष कश्यप (27, मध्य प्रदेश), करण विजय आर्यन (29, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे.

लाखो रुपयांचे सामान जप्त

छाप्यादरम्यान रोख रक्कम, मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच बेटिंगसाठी वापरले जाणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या संशयितांविऊद्ध संबंधित कलमांन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या बेकायदेशीर बेटिंगवर अंकुश ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे गुन्हा शाखेकडून सांगण्यात आले. गुन्हा शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता (आयपीएस) यांच्या देखरेखीखाली हे छापे टाकण्यात आले. अधीक्षक जीवबा दळवी, निरीक्षक विकास देयेकर आणि निरीक्षक अर्जुन सांगोडकर यांनी सहकार्य केले.

Advertisement
Tags :

.