For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य

12:55 PM Oct 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
Advertisement

रत्नागिरी : महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती आता शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीने नोंदवणे अनिवार्य करण्यात आले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शिक्षण याबाबतचे आयुक्तालयाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून (२०२६-२७) ही नवीन प्रणाली लागू करण्यात येत असून १५ ऑक्टोबरपासून सर्व शिक्षकांची ऑनलाईन उपस्थिती SwiftChat पद्वारे नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्राच्या (RVSK) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, Real-Time पद्धतीने विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डॅशबोर्डद्वारे ट्रॅक केली जाणार आहे. यासाठी SwiftChat अॅपमधील 'स्मार्ट उपस्थिती या बॉट (Bot) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. पहिली ते बारावीच्या सर्व शिक्षकांची उपस्थिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी नोंदवणे बंधनकारक राहील.

Advertisement
Advertisement
Tags :

.