कांदा 200 तर इंदोर गोळा बटाटा दर 100 नी वाढला
गूळ आणि रताळी दर स्थिर : तालुक्यातील भाजीपाला आवकेत वाढ
सुधीर गडकरी/अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा भाव प्रति क्विंटल दोनशे रुपयांनी वधारला तर इंदोर गोळा बटाटा भाव शंभर रुपयांनी वाढला. इंदोर मोठवड व मिडीयम बटाटा दर स्थिर आहे. आग्रा बटाटा भाव स्थिर आहे. गुळाचा भाव आणि रताळी दर स्थिर आहे. रताळ्याची सुमारे 550 पोती आवक विक्रीसाठी आली होती. मलकापुरी रताळ्याचा दर क्विंटलला 3000 ते 4000 रुपये झाला. सध्या बेळगाव तालुक्यातील भाजीपाला आवकेत वाढ झाली आहे. गोवा आणि कोकणातून भाजीपाला मागणी थंडावली आहे. यामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. यामुळे येथून मागणी कांही प्रमाणात थंडावली आहे. यामुळे सध्या भाजीपाला दर स्थिर आहेत.
कांदा भाव क्विंटलला 200 रुपयांनी वाढला
महाराष्ट्रातील शेतकरी आषाढी वारीला पंढरपूरला जात आहेत. यामुळे कांदा पोती भरण्यासाठी व विक्रीसाठी कोण जाणार तर कांदा साठेबाज व्यापारी पुन्हा दर वाढणार या अपेक्षेत आहेत. यामुळे महाराष्ट्रातून कांदा आवक बेळगाव बाजारात कमी प्रमाणात येऊ लागला आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये कांदा भाव 4000 ते 6000 रुपये क्विंटल होतो. म्हणून काही शेतकरी व कांदा साठेबाज व व्यापारी कांदा अद्याप विक्रीसाठी काढला नाही. यामुळे कांदा आवकेत टंचाई निर्माण झाली आहे. शनिवारी मार्केटयार्डमध्ये कांदा भाव क्विंटलला 2000 ते 3500 रुपये झाला. यामुळे कांदा दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.
गोळा इंदोर बटाटा शंभरनी वाढ
इंदोरहून बेळगाव एपीएमसीला ट्रकमधून इंदोर बटाटा विक्रीसाठी येतो. काहीवेळा मोठ्या (गोळा) आकाराचा बटाटा इंदोरमधून येतो. तर बहुतांश वेळा मिडीयम व मोठवड आकाराचा बटाटा विक्रीसाठी येतो. यामुळे काही खरेदीदारांना गोळा बटाट्याची आवश्यकता असते. मोठवड बटाटापेक्षा शंभर ते दोनशे रुपये महाग असतो. क्विंटलला तरीसुध्दा कांही खरेदीदार गोळा बटाटा पाहिजे म्हणतात. यामुळे अडत व्यापारी मागणीनुसार क्विंटलला 2000 ते 3500 रुपये झाला. यामुळे कांदा दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली. मोठवड बटाटा ओतून त्यामधील मोठ-मोठे बटाटे काढून गोळा बटाटा खरेदीदारांना देत आहेत. यासाठी चाकी करण्यासाठी पुन्हा हमालीचा खर्च वाढतो. यामुळे गोळा बटाटा शंभर रुपयांनी वाढला आहे.
रताळ्यांच्या मागणीत वाढ
रताळ्याला काही परराज्यामध्ये पावसामध्ये भाजून खाण्यासाठी व उखडून खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्या आषाढी एकादशीला पंढरपूरला माळकरीवर्ग जात आहे. काही माळकरी उपवास असतात. यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या रताळ्याला अधिक मागणी आहे. मार्केटयार्डमध्ये पूर्वी पावसाळी आणि रब्बी हंगामामध्ये रताळी लागवड केली जात होती. त्यामुळे ठराविक कालावधीपर्यंत रताळी मिळत होती. आता मात्र शेतकरी टप्प्याटप्प्याने रताळी लागवड करीत असून मार्केटयार्डमध्ये बारा महिने देखील रताळी मिळतात. तरी आज शनिवारी रताळ्याची सुमारे 550 पिशव्या आवक विक्रीसाठी दाखल झाली असून केवळ मलकापुरी रताळी विक्रीसाठी आली होती. याचा भाव क्विंटलला 3000 ते 4000 हजार रुपयेप्रमाणे झाल्याची माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली.
गुळाचा भाव स्थिर
गुळाची आवक मार्केटयार्डमध्ये आणि रविवारपेठमध्ये जास्त असते. काही खरेदीदार परराज्यातून गूळ मागवितात. तर काही व्यापारी मार्केटयार्डमधील गुळाची खरेदी करतात. तालुक्याच्या पूर्व भागामध्ये अद्याप गूळ बनविण्याचे घने आहेत. या ठिकाणाहून शुध्द प्रकारचे गूळ मार्केटयार्डमध्ये विक्रीसाठी येतो, अशी माहिती गूळ व्यापाऱ्यांनी दिली.