ओएनजीसी-एनटीपीसी आयना रिन्यूएबलचे करणार अधिग्रहण
दोन्ही कंपन्या 100 टक्के हिस्सेदारी घेण्याच्या तयारीत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सरकारी तेल आणि वायू कंपनी ओएनजीसी लिमिटेड आणि सरकारी कंपनी एनटीपीसी लिमिटेड हे संयुक्तपणे आयना रिन्यूएबल पॉवर प्रायव्हेट लिमिटेडमधील 100 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार असल्याचे समजते. या कराराचे मूल्य सुमारे 19,500 कोटी रुपये आहे. भारताच्या अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सरकारी मालकीच्या कंपनीने केलेली ही पहिलीच धोरणात्मक गुंतवणूक आहे. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या इंडिया एनर्जी वीकमध्ये याची घोषणा करण्यात आली. देशातील अक्षय ऊर्जा क्षेत्रातील ही दुसरी सर्वात मोठी खरेदी आहे. 2021 च्या सुरुवातीला, अदानी ग्रीन एनर्जीने 26,000 कोटी रुपयांच्या करारात सॉफ्टबँकची भारतातील अक्षय ऊर्जा मालमत्ता खरेदी केली. ओएनजीसी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही ओएनजीसी ग्रीन लिमिटेड (ओजीएल) आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एनजीईएल) यांच्यातील समान इक्विटी संयुक्त उपक्रम आहे.
(ओएनजीपीएल) ला या कराराबद्दल मोठ्या आशा होत्या. त्यांनी नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड, ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट पीएलसी आणि त्यांच्या उपकंपन्या आणि एव्हरसोर्स कॅपिटलमध्ये हिस्सेदारी खरेदी केली आहे. ओएनजीसी ग्रीन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार मजुमदार म्हणाले की, स्वच्छ ऊर्जा क्रांतीच्या पार्श्वभूमीवर आयनाचे अधिग्रहण हे दोन्ही सरकारी मालकीच्या कंपन्यांसाठी एक महत्त्वपूर्ण यश आहे. ते म्हणाले, ‘दोन सर्वात मोठ्या महारत्न सार्वजनिक कंपन्या देशाच्या अक्षय ऊर्जा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. हे अधिग्रहण आम्हाला कमी कार्बन प्रमाण राखण्याच्यादृष्टीने महत्त्वाचे असणार आहे. हा करार त्यांच्या मूळ कंपन्या ओएनजीसी आणि एनटीपीसीच्या निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन लक्ष्यांशी सुसंगत आहे, असे कंपनीने संयुक्त निवेदनात म्हटले आहे. ओएनजीसीने 2038 पर्यंत आणि एनटीपीसीने 2050 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य ठेवले आहे. निवेदनात म्हटले आहे की ओएनजीपीएल आता आयना यांच्या प्लॅटफॉर्मचा अधिक विस्तार करत या वाढीचा फायदा घेईल.