For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वन प्लसचा नॉर्ड सीई 6 स्मार्टफोन 7 मे रोजी होणार लाँच

06:32 AM Apr 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
वन प्लसचा नॉर्ड सीई 6  स्मार्टफोन 7 मे रोजी होणार लाँच
Advertisement

दोन स्मार्टफोन होणार सादर, 8 हजार एमएएचची बॅटरी

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

चिनी स्मार्टफोन कंपनी वन प्लसचा नवा नॉर्ड सीई 6 हा स्मार्टफोन बाजारात दाखल होण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सदरचा स्मार्टफोन 7 मे 2026 रोजी भारतात लाँच केला जाणार असल्याची माहिती कंपनीकडून मिळते आहे.

Advertisement

नॉर्ड 6 सिरीजअंतर्गत कंपनी सीई 6 आणि सीई 6 लाइट हे फोन बाजारात दाखल करणार आहे. सदरचा स्मार्टफोनचे लाँचिंग 7 मे रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. फोनचा सादरीकरण सोहळा आयोजीत होणार आहे का याबाबत खुलासा कंपनीकडून करण्यात आलेला नाही. नॉर्ड सीई 6 स्मार्टफोनमधला कॅमेरा हा वन प्लस 15, 15 आर या मॉडेलप्रमाणेच असणार असल्याचे सांगितले जात आहे. स्नॅपड्रॅगन 7 एस जन 4 चा प्रोसेसर याला असणार असून 1.5 के अमोलेड डिस्प्ले स्क्रीन दिली जाणार आहे.

इतर महत्त्वाची वैशिष्ट्यो

या फोनला 8 हजार एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी दिली जाणार आहे. तसेच 27 डब्ल्यूचा रिव्हर्स वायर्ड चार्जरही असेल. अॅमेझॉन व कंपनीच्या संकेतस्थळावर सदरचा धूळ आणि पाणीरोधक असा स्मार्टफोन विक्रीकरता उपलब्ध केला जाणार आहे. व्हाईट, ब्लॅक आणि लाइट ब्ल्यू या तीन रंगात स्मार्टफोन सादर केला जाणार आहे. सीई 6 लाइट स्मार्टफोनची किंमत 23 हजार रुपयांच्या आत असेल असे सांगितले जात आहे.

Advertisement
Tags :

.