For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वनप्लसचा नॉर्ड 6 पुढील महिन्यात होणार लाँच

06:27 AM Mar 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
वनप्लसचा नॉर्ड 6 पुढील महिन्यात होणार लाँच
Advertisement

वृत्तसंस्था/  मुंबई

Advertisement

स्नॅपड्रॅगन 8 एस जन 4 प्रोसेसरसह वन प्लसचा नॉर्ड 6 हा स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये लाँच केला जाणार असल्याची माहिती मिळते आहे. या फोनमधील वैशिष्ठ्यो ही चीनमधील वनप्लस टर्बो 6 यासारखीच असल्याचे बोलले जात आहे.

क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 एस जन 4 प्रोसेसर याला असणार आहे. जानेवारी महिन्यात चीनमध्ये वनप्लस टर्बो 6 हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला असून त्यातील वैशिष्ठ्यो नॉर्ड 6मध्येही दिसत असल्याचे समजते. नॉर्ड 6 हा स्मार्टफोन वनप्लस कंपनी पुढील महिन्यात लाँच करु शकते. याबाबतीत तारखेचे स्पष्टीकरण कंपनीने दिलेले नाही. यात 6.87 इंचाचा अमोलेड डिस्प्ले असून गेमिंगसाठी जी 1 इ स्पोर्टस् वायफाय चीप दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात टर्बो 6 स्मार्टफोनला 9 हजार एमएएच क्षमतेची बॅटरी असून नॉर्ड 6 ची बॅटरी त्यापेक्षा थोडी कमी असल्याचा दावा केला जात आहे. किंमतीबाबत बोलायचे झाल्यास नॉर्ड 6 ची किमत ही नॉर्ड 5 पेक्षा अधिक असणार आहे. नॉर्ड 5 ची किमत भारतात 32 हजार ते 40 हजार रुपयांपर्यंत आहे. नॉर्ड 5 हा स्मार्टफोन मागच्या वर्षी जुलैमध्ये लाँच करण्यात आला होता.

Advertisement

ही असू शकतात वैशिष्ठ्यो

?डिस्प्ले : 6.78 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले

?प्रोसेसर : क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 एस जन 4 चिपसेट

?रॅम: 12जीबी, 16 जीबी

?स्टोरेज: 256 जीबी, 512 जीबी

?ऑपरेटिंग सिस्टम: कलर ओएस 16

?रिअर कॅमेरा: 50 एमपी अधिक 2 एमपी

?फ्रंट कॅमेरा:16 एमपी

?चार्जिंग: 80 डब्ल्यू सुपर व्हीओओसी फ्लॅश चार्जर 27 डब्ल्यूचा वायर्ड रिव्हर्स चार्जिंग.

Advertisement
Tags :

.