वन प्लस 15 आर स्मार्ट फोन लाँच
7400 एमएएचची दमदार बॅटरी : 48 हजार रुपये किमत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चिनी कंपनी वन प्लसचा नवा वन प्लस 15 आर हा स्मार्ट फोन नुकताच भारतीय बाजारात लाँच झाला आहे. विशेष म्हणजे 7400 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी या फोनला देण्यात आली असून फोनची किंमत साधारणपणे 48 हजार रुपयांच्या घरात असेल.भारतामध्ये वन प्लसने उत्तम कार्यक्षमतेचा नवा 15 आर स्मार्ट फोन लाँच केला असून यामध्ये 3 एनएम स्नॅपडॅगन 8 जन 5 चिपसेट दिलेली आहे. गेमिंग, मल्टीटास्किंग यासाठी हा फोन वापरता येणार आहे. 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसह येणाऱ्या फोनच्या सुरुवातीची किंमत 47999 रुपये ठेवण्यात आली आहे. 512 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत सुमारे 53 हजार रुपये इतकी असेल.
कधी होणार विक्री
या स्मार्ट फोनची विक्री 22 डिसेंबरपासून अॅमेझॉन, वन प्लसच्या अधिकृत संकेतस्थळ व ऑफलाईन स्टोर्सवरती सुरु झाली. अॅक्सिस आणि एचडीएफसी या सारख्या बँकेच्या कार्डमार्फत फोन खरेदी केल्यास चांगली सवलत मिळू शकणार आहे.
3 रंगात येणार
चारकोल ब्लॅक, मिंट ब्रिझ आणि इलेक्ट्रिक वायोलेट या तीन रंगांमध्ये स्मार्ट फोन येणार असून 6.83 इंचाची फूल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले स्क्रिन येणार आहे. 7400 एमएएचची सिलीकॉन अर्बन बॅटरी देण्यात आली असून 80 डब्ल्यूचा फास्ट चार्जर देण्यात आला आहे. 50 मेगा पिक्सलचा मुख्य पॅमेरा देण्यात आला असून सेल्फी आणि व्हिडीओकॉलिंग करिता 32 मेगपिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
वैशिष्ट्यो...
? 7400 एमएएच बॅटरी
? किमत 48 ते 53 हजार रुपये
? 12 जीबी व 256 जीबी स्टोरेज
? 50 मेगापिक्सलचा कॅमेरा
? विक्रीला झाला प्रारंभ