वनप्लस 13 एस भारतीय बाजारात दाखल
किंमत 54,999 रुपये : 50 एमपीचा कॅमेरा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वनप्लसने भारतात आपला नवीन स्मार्टफोन वनप्लस 13 एस सादर केला आहे. हा वनप्लसचा सर्वात लहान फोन आहे. याची सुरुवातीची किंमत ही 54,999 रुपये असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. हा फोन ब्लॅक वेलवेट, पिंक सॅटिन आणि ग्रीन सिल्क या तीन रंगांमध्ये उपलब्ध राहणार आहे. गुलाबी सॅटिन आणि ग्रीन सिल्कमध्ये मखमली काचेचे तंत्रज्ञान आहे. जी फोनला सॉफ्ट आणि मॅट फिनिश देणारी असणार आहे.
डिझाइन आणि डिस्प्ले
वनप्लस 13 एसमध्ये 120 एचझेड रिफ्रेश रेटसह 6.32 इंच 1.5 के अमोलेड डिस्प्ले आहे. सदरची स्क्रीन ही 1600 निट्स ब्राइटनेस देणार असल्याने सूर्यप्रकाशातही स्पष्टपणे स्मार्टफोन पाहता येणार आहे. 50 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेराही मिळणार आहे.
यासोबतच फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर आहे. जो नवीनतम आणि शक्तीशाली चिपसेट आहे. हा प्रोसेसर गेमिंग, मल्टीटास्किंग आणि अन्य अॅप्ससोबत राहणार आहे.