महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रत्येक कुटुंबातून एक युवा रामकार्याला समर्पित व्हावा

12:28 PM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पद्मश्री विभूषित सद्गुऊ ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींचे आवाहन : हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत ‘चलो अयोध्या’चा नारा

Advertisement

म्हापसा : वेगवेगळ्या पदांच्या पलीकडे जाऊन देशाला समृद्ध बनविण्यासाठी हिंदू संघटित होण्याची आवश्यकता आहे. प्रभू रामचंद्रांचे मंदिर रामजन्मभूमीत होते यासारखा आनंद नाही. राम जन्मभूमीत 500 वर्षे संघर्ष करावा लागला ही खंत आहे. आता गोव्यात प्रत्येक हिंदू कुटुंबातून एक युवा रामकार्याला समर्पित होत आहे. साधू संतानी वसुधैव कुटुंबकम् भावना विश्वाला दिला कारण प्रभू श्रीराम हे विश्वाचा आदर्श आहे. मात्र पाश्चात्यांनी याचा दुऊपयोग कऊन देशावर अधिराज्य गाजवले, हिंदुंच्या उदार काळजाचा फायदा घेतला, असे संबोधन पद्मश्री विभूषित सद्गुऊ ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी केले. अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य मोठ्याप्रमाणात सुऊ आहे.  दि. 22 जानेवारी 2024 रोजी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसेच देशभरातील संत - महंतांच्या उपस्थितीत अयोध्या श्रीराम मंदिर उद्घाटन तथा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना ऐतिहासिक सोहळा सुसंपन्न होणार आहे. याच अनुषंगाने श्री दत्त पद्मनाभ पीठातर्फे पद्मश्री विभूषित सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य मार्गदर्शनाखाली गोव्यात ‘चलो अयोध्या’ हे महाअभियान सुऊ केले आहे. काल येथे संपन्न झालेल्या ‘चलो अयोध्या’ कार्यक्रमात पूज्य स्वामीजी संबोधित करीत होते.

Advertisement

श्रीराम घोषाने दुमदुमली नगरी

भव्य पदयात्रा, श्रीराम पूजन, भव्य प्रकट कार्यक्रमात हिंदू कुटुंबातला एक राम म्हणजे एक तऊण श्रीरामकार्यासाठी समर्पित करण्याचा संकल्प, पूज्य स्वामीजींचे दिव्य संबोधन व श्रीरामनामच्या उद्घोष, जयजयकार, नृत्य ढोलताशांच्या गजरात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात दुमदुमला. व्यासपीठावर पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार चंद्रकांत शेट्यो, प्रेमेंद्र शेट, अॅङ ब्राह्मी देवी, सौ. सुलक्षणा प्रमोद सावंत, आमदार केदार नाईक, माजीमंत्री जयेश साळगावकर, विविध हिंदू संस्थांचे प्रतिनिधी - बाबू चांदेकर (रा.स्व.सं.), मोहन आमशेकर (वि.हिं.प.) शोभा नाईक (सनातन संस्था) प्रीया मिशाळ (नगराध्यक्ष-म्हापसा), दयानंद सोपटे (माजी आमदार), सिद्धार्थ मांद्रेकर (स्वराज क्लब), तारक आरोलकर (नगरसेवक), गणेशपुरी मंदिराचे अध्यक्ष सत्यवान भिवशेट, कळंगुटचे पंच सुदेश मयेकर, डॉ. श्रीपाद परब, सनातन संस्थेच्या शुभा सावंत, राजेंद्र भोबे, महेश साटेलकर, रामा साटेलकर, सुधीर कांदोळकर आदि उपस्थित होते.

 देशकार्य करण्याची गरज

विराट हिंदु समूदायाला मार्गदर्शन करताना स्वामीजी पुढे म्हणाले की प्रभू श्रीरामाने तळागाळातील लोकांपासून उच्च लोकांपर्यंत सर्वाना सोबत घेऊन आसुरी शक्तींवर विजय मिळविला त्याप्रमाणेच आपण सर्वाना सोबत घेऊन देशकार्य करण्याची आवश्यकता आहे.

 देशरक्षणाचे कार्य महत्वाचे

मर्यादेत राहून काम करावे, पण दुसऱ्याने मर्यादा सोडली तर त्याची मर्यादा दाखवता आली पाहिजे. देशाला काळिमा फासले जाईल असे काम करू नये मात्र देश रक्षणाचे कार्य करताना जात, पंथ बाजूला ठेवून आपण हिंदू म्हणून जगले पाहिजे पाहिजे.

 ... तर त्यांना जागा दाखवावी

सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारा धर्म आपल्याला पुढच्या पिढीला देण्याची आवश्यकता आहे. राम काल्पनिक असे जर कुणी म्हणत असाल तर देशवासीय त्यांना त्यांची जागा दाखवतील, असेही पूज्य स्वामीजींनी संबोधित केले.

 श्रीरामभक्तांची लढाई : आमशेकर

यावेळी बोलताना विहिंपचे गोवा प्रमुख मोहन आमशेकर म्हणाले की लढाया फक्त राजांनीच केल्या नाहीत, तर जनतेनेही केल्या आहेत. अशीच श्रीरामचंद्र जन्मभूमीची लढाई जनसामान्य रामभक्तांनी लढली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रमुख बाबा चांदेकर, सौ. सुलक्षणा सावंत यांचीही भाषणे झाली. या विशाल कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने हिंदूधर्मिय धर्मध्वज घेऊन कार्यक्रमात सहभागी झाले होते. सूत्रसंचालन त्रिंबक केदार यांनी तर आभारप्रदर्शन श्रीराज शेलार यांनी केले. श्री क्षेत्र तपोभूमीचे संस्थापक, राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींनी 1989 व 1992 साली अयोध्या श्रीराममंदिराच्या आंदोलनात गोव्याचे नेतृत्व केले होते. गोव्यात श्रीराम शिलापूजन, श्रीराम महायज्ञ, धर्म सभा, गंगापूजन, संत सम्मेलन अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पूज्य स्वामीजींनी जनजागृतीसाठी यशस्वी भूमिका बजावली व आंदोलनाला एक यशस्वी चालना दिली होती. तद्नंतर विद्यमान पीठाधीश्वर सद्गुऊ ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी देवस्थान संरक्षण महासभा, विशाल धर्मसभा, अखिल भारतीय संत सभा, हिंदू धर्म आचार्य सभा, दिव्य देवस्थान सभा अशा अनेक माध्यमातून यशस्वी नेतृत्व केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article