For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आयबी’ प्रमुखांना एक वर्ष मुदतवाढ

06:22 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘आयबी’ प्रमुखांना एक वर्ष मुदतवाढ
Advertisement

कार्मिक मंत्रालयाकडून आदेश जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) प्रमुख तपन कुमार डेका यांना सेवेत जून 2025 पर्यंत म्हणजे पुढील एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. यासंदर्भात कार्मिक मंत्रालयाने सोमवारी रात्री आदेश जारी केला आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या मुदतवाढीला औपचारिक मान्यता दिली आहे. त्यांचा कार्यकाळ 30 जून 2024 रोजी पूर्ण होत असतानाच त्यांना मुदतवाढ मिळाली आहे.

Advertisement

तपन कुमार डेका हे 1988 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) हिमाचल प्रदेश केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीचा बहुतांश काळ इंटेलिजन्स ब्युरोमध्ये घालवला आहे. ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अतिरिक्त संचालकही राहिले आहेत. त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादासह टार्गेट किलिंगसारखी महत्त्वाची प्रकरणे जबाबदारीने हाताळली आहेत.

याआधी केंद्र सरकारने अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा एनएसए (राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) म्हणून नियुक्ती केली होती. गेल्या 10 वर्षांपासून ते एनएसए आहेत. मोदी सरकारने त्यांना सलग तिसऱ्यांदा सेवेत मुदतवाढ दिली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ते या पदावर राहणार आहेत.

Advertisement
Tags :

.