For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गृह, कॅबिनेट सचिवांना एक वर्षाची मुदतवाढ

06:11 AM Aug 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
गृह  कॅबिनेट सचिवांना एक वर्षाची मुदतवाढ
Advertisement

वृत्तसंस्था

Advertisement

नवी दिल्ली

केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन आणि कॅबिनेट सचिव टी. व्ही. सोमनाथन यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून बुधवारी यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली. हे अधिकारी आता पुढील वर्षभर आपल्या पदांवर कायम राहतील. टी. व्ही. सोमनाथन 30 ऑगस्ट 2027 पर्यंत आणि गोविंद मोहन 22 ऑगस्ट 2027 पर्यंत आपल्या पदांवर कायम राहतील.

Advertisement

कार्मिक मंत्रालयाच्या एका आदेशानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सोमनाथन यांचा कॅबिनेट सचिव पदाचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2026 नंतर आणखी एका वर्षासाठी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. तसेच गृह सचिव मोहन यांच्या सेवेला 22 ऑगस्ट 2026 नंतर 22 ऑगस्ट 2027 पर्यंत एक वर्षाची मुदतवाढ देण्यासही मंजुरी दिली आहे. तामिळनाडू केडरचे 1987-बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी असलेल्या सोमनाथन यांची ऑगस्ट 2024 मध्ये दोन वर्षांच्या कालावधीसाठी या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.