For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘वन वर्ल्ड वन फॅमिली कप’चे 8 रोजी आयोजन

06:28 AM Feb 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘वन वर्ल्ड वन फॅमिली कप’चे 8 रोजी आयोजन
Advertisement

निवृत्त दिग्गज भारतीय, लंकन खेळाडू झळकणार, सुनील गावसकर, मधुसूदन साई यांच्या हस्ते चषकाचे अनावरण

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि मानवतावादी कार्यासाठी ओळखले जाणारे मधुसूदन साई यांनी 2025 वन वर्ल्ड वन फॅमिली कपचे अनावरण केले. हा एकता आणि मानवतावादी कार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेला क्रिकेट उपक्रम असल्याचे ‘वन वर्ल्ड वन फॅमिली कप’च्या निवेदनात म्हटले आहे. या कपवर ‘वसुधैव कुटुंबकम’ असा संदेश कोरलेला आहे.

Advertisement

दोन प्रसिद्ध क्रिकेट खेळाडूंच्या सन्मानार्थ सद्गुरू मधुसुदन साई कर्नाटकातील सत्य साई ग्राम, मुद्देनहल्ली येथे मुलांसाठी निवासी क्रिकेट अकादमीची स्थापना करणार आहेत. त्यासाठी निवडीचे निकष पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असतील आणि पात्र खेळाडूंकरिता मोफत प्रशिक्षण आणि राहण्याची व्यवस्था केली जाईल, असे कळविण्यात आले आहे. भारत आणि श्रीलंकेचे प्रसिद्ध निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू 8 फेब्रुवारी रोजी कर्नाटकातील चिक्काबल्लापूर जिह्यातील मु•sनहल्ली येथील साई कृष्णन क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या ‘वन वर्ल्ड वन फॅमिली कप’मध्ये खेळताना दिसणार आहेत.

‘मधुसूदन साई ग्लोबल ह्युमॅनेटेरियन मिशनने अनेक उपक्रमांद्वारे आपला ठसा उमटविलेला आहे. जानेवारी, 2024 मध्ये जेव्हा ‘वन वर्ल्ड वन फॅमिली कप’ची पहिली आवृत्ती खेळविली गेली तेव्हा एका संघाचे नेतृत्व महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने केले होते. या वर्षी एका वेगळ्या स्वरूपात भारतीय आणि श्रीलंकेचे निवृत्त खेळाडू मानवतेच्या फायद्यासाठी खेळण्याकरिता पुन्हा मैदानावर दिसणार आहेत. भारताचे इरफान पठाण, युसूफ पठाण, वेंकटेश प्रसाद आणि श्रीलंकेचे अजंता मेंडिस, चामिंडा वास, अरविंद डी सिल्वा, मुथय्या मुरलीधरन यासारखे दिग्गज खेळाडू यावेळी एकत्र येणार आहेत.

या अनोख्या क्रिकेट उपक्रमाबद्दल बोलताना माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले की, एक वेळ आपण देशासाठी लढण्याची गरज होती आणि आता वेळ आली आहे की, आपण फक्त एका देशाच्या मर्यादेपलीकडे जाऊन एका मोठ्या कारणासाठी लढू. देशाचे वैभव केवळ त्याच्या कामगिरीत नाही, तर त्याच्या आदर्शांमध्ये देखील आहे

Advertisement
Tags :

.