... शहरातील एकेरी वाहतूक नावालाच
विटा/ सचिन भादुले :
परिसरातील तालुक्यांतून विटा शहरात येणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. मात्र वाहन पार्किंग आणि वाहतुकीलाही शिस्त लावण्याची गरज आहे. सुमारे दहा वर्षापूर्वी याच कारणासाठी एकेरी वाहतुकीच्या रस्त्यांची अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. परिणामी वर्दळीच्या रस्त्यावर वाहतुक कोंडी नित्याची बाब बनली आहे.
बिटा शहरातील लेंगरे रस्ता ते पंचमुखी गणपती मंदीरपासून शिवाजी चौकाकडे येणारा रस्ता, शकुन कॉर्नर ते मॉडर्न सोसायटी रस्ता, चंडिश्वरी चौक ते मायणी रस्ता, फॉरेस्ट ऑफिस ते साळशिंगे रस्ता असे विविध रस्ते एकेरी वाहतुकीचे रस्ते म्हणून जाहीर करण्यात आले. मात्र वाहनधारक ना वाहतुकीच्या शिस्तीचे पालन करतात ना पार्किंगच्या नियमांचे. परिणामी बेशिस्त वाहतुक विटेकरांच्या दररोजच नशिबाला आहे.
विट्यातील सराफ कट्टा, गणेश पेठ, मॉडर्न सोसायटी, पॉवर हाऊस, बिरोबा मंदीर, क्रांतिसिंह नाना पाटील चौक आदी ठिकाणी रस्ते अगोदरच असंव आहेत. अशावेळी दोन्ही बाजूला दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्किंग केल्यास पादचाऱ्यांना सहज चालणे मुश्किल होत आहे. अशातच पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डयातील पाणी नागरिकांच्या कपडयावर उडणे ही नित्याची बाब बनली आहे.
साळशिंगे रस्त्यावरील सौ. इंदीराबाई भिडे कन्याप्रशाला, महात्मा गांधी हायस्कूल, मॉडर्न सोसायटीच्या शाळा आणि बळवंत महाविद्यालय तसेच मायणी रस्त्यावरील आदर्श महाविद्यालय सुटल्यानंतर या रस्त्यावरून विद्याथ्यर्थ्यांची वर्दळ अधिक असते. अशावेळी रोडरोमिओ रस्त्यावरून सुसाट दुचाकी पळवत असतात. त्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांची गस्त असणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष होत आहे.
शहरातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र ही वाहने रस्त्याकडेला बेशिस्तपणे लावून आपणच आपल्याला अडचणी निर्माण करीत आहोत, याचे भान प्रत्येकाने बाळगणे गरजेचे आहे. एकुणच विटा शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी एकेरी वाहतुकीसाठी ज्या रस्त्याची अधिसुचना काढली आहे, त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. शिवाय त्यामध्ये काही नविन रस्ते एकेरी वाहतुकीसाठी जाहीर करणे आवश्यक आहे.
त्यासाठी प्रशासनाने गांभीयनि प्रयत्न केले पाहिजेत. केवळ पार्किंग हेच एकमेव वाहतुकीच्या कोंडीचे कारण असू शकत नाही.
गणेश पेठ, उभी पेठ, मायणी रस्ता, चौंडेश्वरी रस्ता, शिवाजी चौक, चौंडेश्वरी चौक, क्रांतिसिंह नाना पाटील चौक या ठिकाणी व्यापारी वाहने बऱ्याच वेळा माल उतरण्यासाठी रस्त्यातच उभा केलेली आढळून येतात. त्यांना वेळेचे बंधन पूर्वी घातले होते. अलिकडे ते वेळेचे बंधन कोणीच पाळताना दिसत नाही. परिणामी ऐन गर्दीच्या वेळी मालवाहतुकीच्या गाड्या रस्त्यात उभा राहून माल उतरतात. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. वाहतुक कोंडीला केवळ प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही. स्वयंशिस्तीचे पालन देखिल तितकेच महत्वाचे आहे. अन्यथा प्रशासनाच्या भरवशावर वाहतुकीला शिस्त लागेल, हे स्वप्न पाहणे अधिक मनोरंजक असेल, मात्र सत्यात उतरणे कठीण असेल.
- या रस्त्यांना एकेरी वाहतूक शक्य
पंचमुखी गणपती मंबिरपासून लेंगरे रस्त्याकडे, शकुन कॉर्नर ते मॉडर्न सोसायटी रस्ता, चौंडेश्वरी चौक ते मायणी रस्ता, फॉरेस्ट ऑ फिस ते साळशिंगे रस्ता, वगडी पाण्याची टाकी ते पॉवर हाऊस रोड, बिरोबा मंदिर, आडवी पेठ ते कराड रस्ता, मौलाना आझाव चौकातून मारूती मंविराकडे येणारा रस्ता, लेंगरे रस्ता ते कापड पेठेतून मायणी रस्ता