For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अयोध्येसाठी धावणार एक हजार विशेष रेल्वे

06:23 AM Dec 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
अयोध्येसाठी धावणार एक हजार विशेष रेल्वे
Advertisement

राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त नियोजन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भारतीय रेल्वेने अयोध्येला 1000 विशेष रेल्वे चालवण्याची योजना आखली आहे. उद्घाटन सोहळ्यापूर्वी 19 जानेवारीपासून विशेष रेल्वेगाड्या सुरू होतील. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर 23 जानेवारीपासून मंदिर जनतेसाठी खुले होणार आहे. नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळूर, पुणे, कोलकाता, नागपूर, लखनौ आणि जम्मूमधून विशेष रेल्वे पाठविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. अयोध्या मंदिराच्या उद्घाटनानंतर येथे येणाऱ्या भक्तांची व प्रवाशांची गर्दी हाताळण्यासाठी अयोध्या स्थानकाची नव्याने रचना करण्यात आली आहे. प्रवास सुविधेबरोबरच प्रवाशांसाठी कॅटरिंग सेवा चोवीस तास चालू ठेवण्याचा विचारही सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.