For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेचा चीनवर एकतर्फी विजय

06:14 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेचा चीनवर एकतर्फी विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ फ्लोरिडा

Advertisement

शनिवारी येथे झालेल्या महिलांच्या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात अमेरिकन महिला फुटबॉल संघाने चीनचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. उभय संघामध्ये दोन प्रदर्शनीय सामने खेळवले जात आहते. आता उभय संघातील दुसरा सामना मंगळवारी होत आहे.

शनिवारच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेतर्फे सोफिया स्मिथने तसेच लिंडसे होरेन व ट्रिनिटी रॉडमन यांनी प्रत्येकी 1 गोल केला. सामन्यातील 8 व्या मिनिटाला सोफिया स्मिथने अमेरिकेचे खाते उघडले. स्मिथने अलिकडच्या कालावधीत 37 सामन्यात आपला सहभाग दर्शविला असून तिचा हा 15 वा गोल ठरला. मध्यंतरापर्यंत अमेरिकेने चीनवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. 52 व्या मिनिटाला लिंडसे होरेनने अमेरिकेचा दुसरा गोल केला. 77 व्या मिनिटाला रॉडमनने अमेरिकेचा तिसरा गोल करुन चीनने आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले.

Advertisement

Advertisement
Tags :

.