महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अस्वलाच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी

10:54 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव बिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Advertisement

खानापूर : लोंढ्याजवळील मांजरपै येथील शेतकऱ्यावर मंगळवार दि. 16 रोजी सकाळी 6.30 वाजता शेताकडे जात असताना एका अस्वलाने अचानक हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला. त्याच्यावर बेळगाव बिम्स इस्पितळात उपचार सुरू आहेत. लोंढ्याजवळ असलेल्या मांजरपै येथील शेतकरी व माजी सैनिक प्रभू विष्णू डिगीकर (वय 61) हे पहाटे 6.30 वाजता आपल्या शेताकडे निघाले होते. गावाजवळच अस्वलाने अचानक हल्ला करून छातीवर आणि मांडीवर चावा घेतल्याने तसेच ओरबडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यामागून त्यांचे भाऊ शेताकडे येत होते. त्यामुळे त्यांनी आरडाओरड करून अस्वलाला पळवून लावले. त्यानंतर गावातील लोक जमा झाल्यानंतर तातडीने वनखात्याला माहिती देण्यात आली. वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनाधिकाऱ्यांनी आपल्या वाहनातून जखमी प्रभू डिगीकर यांना लेंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी खानापूर इस्पितळात हलवण्यात आले. खानापूर इस्पितळातील डॉक्टरांनी उपचार करून त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. बेळगाव जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Advertisement

बंदोबस्तासाठी उपाययोजना करू

याबाबत वनखात्याचे अधिकारी तेज वाय. पी. म्हणाले, या अस्वलाबरोबर पिल्लू असल्याने त्याने अचानक हल्ला केला. सध्या पावसाळी वातावरण असल्याने जंगलातील प्राणी एकदम नजरेस येत नाहीत. बेसावधपणे जाणाऱ्या माणसावर असा हल्ला होऊ शकतो. यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. वनखात्याकडून आवश्यक ती मदत पुरवली जाईल, तसेच अस्वलाच्या बंदोबस्तासाठी उपाययोजनाही हाती घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article