For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वन प्लस 12 स्मार्टफोन पुढील वर्षी भारतीय बाजारात येण्याची शक्यता

06:31 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
वन प्लस 12 स्मार्टफोन पुढील वर्षी भारतीय बाजारात येण्याची शक्यता
Advertisement

जानेवारीत भारतात उपलब्ध होणार : 4 डिसेंबरला चीनमध्ये होणार लाँच

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चीनमधील कंपनी वन प्लस यांचा वन प्लस 12 हा स्मार्टफोन पुढील वर्षी भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

सदरचा नवा स्मार्टफोन फ्रॉस्ट व्हाईट, सियान ग्रीन आणि ऑब्सीडियन ब्लॅक या तीन रंगांमध्ये येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कंपनी या नव्या स्मार्टफोनमध्ये पाठीमागे वुड ग्रेनचा पोत देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चीनमध्ये सदरचा नवा स्मार्टफोन 4 डिसेंबरला दहाव्या यशस्वी वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्ताने लॉन्च केला जाणार आहे. याच दरम्यान कंपनी वन प्लस एस-3 हा फोनही सादर करणार असल्याची माहिती आहे. सदरचे दोन्ही कंपनीचे स्मार्टफोन हे जानेवारी 2024 मध्ये भारतीय बाजारामध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वन प्लस 12 स्मार्टफोनमध्ये अनेक वैशिष्ट्यो समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये सोनी एलवायटी 808 इमेजिंग सेन्सर असणार असून कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे याचा मात्र खुलासा करण्यात आलेला नाही पण तरीही मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार 64 मेगापिक्सलपेक्षा जास्त क्षमतेचा असू शकतो. कॉलकाम स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 3 चीप या स्मार्टफोनमध्ये समाविष्ट केलेली असून 2 के रिझोल्युशनचा अमोलेड क्रीनही यात असणार आहे.

रेडमी 13 सी 6 डिसेंबरला होणार लाँच

शाओमी कंपनी आपला नवा फोन रेडमी 13 सी भारतात लाँच करणार असून त्यासंबंधीची तारीख कंपनीने जाहीर केली आहे. सदरचा नवा स्मार्टफोन 6 डिसेंबरला भारतात लाँच करण्याचे निश्चित केले आहे. गेल्या बऱ्याच कालावधीपासून शाओमीचा नवा फोन बाजारात आला नव्हता. गेल्या काही महिन्यापूर्वी सदरचा स्मार्टफोन चीनबाहेर लाँच झाला आहे. सदरचा स्मार्टफोन हेलियो जी99 मीडियाटेक प्रोसेसरसह येणार असून स्टारडस्ट ब्लॅक आणि स्टार शाइन ग्रीन या दोन रंगात येणार आहे. 50 मेगापिक्सलचा यात कॅमेरा असेल. अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या या फोनची स्क्रीन 6.74 इंचाची आहे. 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरजची व्यवस्था तसेच 5000 एमएएचची बॅटरी यात असेल.

Advertisement
Tags :

.