For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

एक गोळी अन् तुम्ही सुपरफिट

06:03 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
एक गोळी अन् तुम्ही सुपरफिट

वैज्ञानिकांकडून ‘एक्सरसाइज पिल’ तयार

Advertisement

अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी एक असे औषध तयार केले आहे, ज्याच्या सेवनानंतर तुम्हाला कसरत करण्याची गरज भासणार नाही. ही गोळी खाल्ल्यावर शरीरात तेच बदल दिसून येतील, जे व्यायामानंतर दिसून येतात. सध्या या औषधाचे उंदरांवर परीक्षण केले जात असून तेथे वैज्ञानिकांना मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे.

या औषधाला सध्या एक्सरसाइज पिल म्हटले जाते. उंदरांना ही गोळी देण्या आल्यावर त्यांच्या शरीराचे मेटाबॉलिजम व्यायामानंतर होणाऱ्या स्थितीप्रमाणे झाले. सातत्याने हे औषध दिल्यावर उंदरांच्या स्नायूंच्या शक्तीत वाढ झाली तसेच तंदुरुस्ती सुधारली, त्यांची शारीरिक क्षमता वाढली आहे.

Advertisement

या औषधाचे रासायनिक नाव ‘एसएलयू-पीपी-332’ आहे. या औषधावरून समोर आलेले निष्कर्ष वैज्ञानिकांनी अमेरिकन केमिकल सोसायटीत सादर केले आहेत. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे प्रमुख संशोधक आणि केमिस्ट बाहा एलगेंडी यांनी हे आरामात गिळता येणारी गोळी असून यामुळे शरीराचे मेटाबॉलिजम सुधारत असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

मोठ्या आजारांवर उपचार शक्य

जर मानवी शरीरात ही गोळी उंदरांमध्ये दाखवत असलेला प्रभाव करण्यास यशस्वी ठरल्यास हा अत्यंत मोठा बदल ठरणार आहे. याचा वापर अनेक दुर्लभ आजार बरे करण्यास केला जाऊ शकतो. प्रत्यक्षात जेव्हा एखादा व्यक्ती कसरत करतो तेव्हा शरीरात एस्ट्रोजेन रिलेटेड रिसेप्टर्स अॅक्टिव्ह होत असतात अशी माहिती एलगेंडी यांनी दिली आहे.

शरीरात घडवितो अनेक प्रकारचे बदल

हे रिसेप्टर्स स्नायू, हृदय आणि मेंदूंच्या पेशींमध्ये आढळून येतात. हे रिसेप्टर्स मेटाबॉलिजम, इम्युनिटी, इंफ्लेमेशन, होमियोस्टेसिस, शारीरिक विकास, पेशींचा विकास आणि रिप्रॉडक्शनमध्ये मदत करतात. म्हणजेच ही एक्सरसाइज पिल सेवन केल्यास रिसेप्टर्स अॅक्टिव्ह होतील, जे सर्वसाधारणपणे कसरत केल्याने सक्रीय होतात.

मानवी परीक्षणाची तयारी

फ्लोरिडा विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी देखील अशाप्रकारचे औषध निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना यात यश आले नव्हते. आम्ही हे औषध तयार करण्यासाठी प्रथम एक स्टार्टअप औषध कंपनी स्थापन केली असू याचे नाव पेलोजो फार्मास्युटिकल ठेवले आहे. आमचे परीक्षण उंदरांवर यशस्वी ठरले असून आता मानवी वैद्यकीय परीक्षणाची अनुमती मागण्यात आल्याचे एलगेंडी यांनी सांगितले आहे.

शारीरिक क्षमतेत 80 टक्के वाढ

हे औषध घेतल्यावर उंदरांच्या शारीरिक क्षमतेत 70 टक्क्यांची वाढ झाल आहे. औषधाचा डोस दोनवेळा देण्यात आल्यावर त्यांच्या क्षमतेत आणखी 10 टक्के वाढ झाली. हे औषध कसरतीची जागा घेऊ शकत नाही, परंतु त्याच्यासारखे फायदे मिळवून देऊ शकते असे एलगेंडी यांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :
×

.