For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा चाकूने हल्ला करून खून

12:24 PM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा चाकूने हल्ला करून खून
Advertisement

सौंदत्ती-रामदुर्ग रस्त्यावरील घटना : आरोपीही झटापटीत जखमी

Advertisement

बेळगाव : आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मुलाने एकाचा चाकूने हल्ला करून निर्घृण खून केल्याची घटना सोमवार दि. 2 रोजी सायंकाळी होलकट्टी गावातील सौंदत्ती-रामदुर्ग रस्त्यावर घडली आहे. बसवराज पराप्पा होसमनी (वय 49) रा. बसीडोणी असे खून झालेल्याचे नाव असून याप्रकरणी इरय्या संगय्या मठपती (वय 32) रा. बसीडोणी याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत बसवराज याचे आरोपीची आई शिवय्या ऊर्फ सुवर्णा हिच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. त्यामुळे आरोपीने बसवराजचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले होते.

बसवराज हा गवंडी काम करीत होता. आरोपीने त्याच्यावर पाळत ठेवून सोमवारी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान होलीकट्टी गावातील सौंदत्ती-रामदुर्ग रस्त्यावर बसवराजला गाठले. त्या ठिकाणी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. खून करण्याच्या उद्देशाने आरोपीने बसवराजवर चाकूने हल्ला केला. बसवराजनेही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र डोक्यावर, पोटावर, बाहुवर, पाठीवर आणि हातावर चाकूचे वर्मी घाव बसल्याने बसवराज जागीच ठार झाला. यावेळी झालेल्या झटापटीत इरय्यादेखील जखमी झाला. खुनाची माहिती समजताच सौंदत्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आरोपीदेखील जखमी असल्याने त्याच्यावर धारवाड येथील इस्पितळात उपचार सुरू आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.