For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara : दोन दुचाकीच्या अपघातात वरकुटेतील एकाचा मृत्यू

05:58 PM Jan 08, 2026 IST | NEETA POTDAR
satara   दोन दुचाकीच्या अपघातात वरकुटेतील एकाचा मृत्यू
Advertisement

                           पंढरपूर–मल्हारपेठ मार्गावर दुचाकी अपघात

Advertisement

माण : माण तालुक्यातील बरकुटे-मलवडी पासून दक्षिणेला पंढरपूर-मल्हारपेठ पेट्रोल पंपानजीक झालेल्या दोन दुचाकींच्या भीषण अपघातात बरकुटे-मलवडीतील पोळ वस्ती येथील संतोष रघुनाथ पोळ (वय ५०) मृत्यू झाला. असणाऱ्या मार्गावरील

याबाबत पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार संतोष पोळ हे त्यांच्या दुचाकीवरून मल्हारपेठ मार्गावरून दिर्घचीकडून येत होते. त्याचवेळी शेनवडीच्या बाजूने समोरुन आलेल्या ऋषिकेश रविंद्र गोंजारी यांनी पोळ यांच्या गाडीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने संतोष पोळ यांचा मृत्यू झाला.

Advertisement

अर्जुन सर्जेराव यादव यांनी ऋषिकेश गोंजारी (रा. वियंची ता. आटपाडी जि. सांगली) याचेविरूद्ध म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून, अधिक तपास म्हसवड विट अंमलदार जगन्नाथ लुबाळ करीत आहेत.

Advertisement
Tags :

.