For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तारळे खुर्द तालुका राधानगरी येथे अपघातात एकाचा मृत्यू

03:35 PM Jan 21, 2025 IST | Pooja Marathe
तारळे खुर्द तालुका राधानगरी येथे अपघातात एकाचा मृत्यू
Advertisement

कोल्हापूर
तारळे खुर्द तालुका राधानगरी येथे मोटरसायकलच्या जोरदार धडकेने एकाचा जागेवर मृत्यू झाला. याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की,तारळे खुर्द व कळंकवाडीच्या दरम्यान म्हारकी नावाच्या शेतामध्ये मयतआनंदा ज्ञानू पाटील वय वर्ष 65 यांचे शेतघर गोठा आहे. सकाळी जनावरांना वैरण पाणी घालण्यासाठी शेतातील घरात गेला असता त्याच वेळी सकाळी साडे सहाचे दरम्यान तरसंबळे येथील दत्तात्रय श्रीपती कांबळे हा मोटरसायकल MH 09 fs 6952 या प्लॅटिना गाडीवरून तारळेकडे येत होता. त्यावेळी त्याचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने मयत आनंदा यांना जोराची धडक दिली त्यामध्ये आनंदा पाटील हे रस्त्यावर पडल्याने व जबर मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तर दत्तात्रय श्रीपती कांबळे हा ही जखमी झाला
दरम्यान मयत याचा भाऊ सुरेश पाटील यांनी आनंदा ज्ञानू पाटील यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला पण डॉक्टरानी त्यांना मृत झालेचे सांगितले. मयाताचा शव विच्छेदन राधानगरी ग्रामीण रुग्णालयात केले असुन अपघातादरम्यान आरोपी दत्तात्रय कांबळे हे पण जखमी झाल्याने राधानगरी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
याबाबतची फिर्याद मयत याचा भाऊ सुरेश पाटील यानी राधानगरी पोलीस स्टेशनला आरोपी दत्तात्रय कांबळे यानी हायगईने मोटासायकल चालवून रस्त्याचा परस्तीतिकडे दुर्लक्ष करून जोराची धडक दिल्याने मृत्यूस कारणीभूत झाल्याची तक्रार दिली असून अधिक तपास राधानगरी पी एस आय संतोष गोरे यांचा मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कोळी करत आहेत.
याच ठिकाणी मयत आनंदा ज्ञानु पाटील यांचा वडिलांचा तिन चार वर्षापूर्वी अपघाती निधन झाले होते. त्याची आठवण ताजी झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.