For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकावर एक फ्री...(2)

06:09 AM Nov 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
एकावर एक फ्री    2
Advertisement

आता त्या मॉलमध्ये हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झाली. वरून छतावरून खारुताईंनी त्या मॉलमध्ये प्रवेश केला. ती सर्वत्र बघत बघत पुढे येत होती आणि प्रत्येक गोष्ट तिला घ्यावीशी वाटत होती. एखाद्या वस्तुपाशी पोहचायचे आणि पुन्हा मागे यायचे असा तिचा उपक्रम होता. वरून खाली आणि खालून वर हा तिचा नित्यनेमाचा कार्यक्रम इथेही सुरू झाला. प्रत्येक मजल्यावरती प्रत्येक दुकानात डोकवायचं आणि थोडे पुढे जायचं. थोडे मागे, थोडे पुढे असा तिचा क्रम सुरुच होता. नुसत्या चौकशा करत हिंडायचे. असं करता करता तिला एका दुकानात एक सुंदर झुपकेदार गोंडा दिसला. याचं काय बरं करता येईल? या विचारात ती गढून गेली.

Advertisement

एकदा शेपटी म्हणून लावला, तर एकदा शालीसारखा घेऊन पाहिला. एकदा झाडून सुद्धा पाहिले, सगळ्याच कामाला उपयोगी ठरणारा तो गोंडा घ्यायचं सरतेशेवटी तिने ठरवलं. थ्री इन वन एवढा फायदा मिळणार होता. पण त्याच्या बरोबर फ्री काय मिळणार माहित नव्हतं. तेव्हा त्याची वेगळी उत्सुकता होतीच खारुच्या मनात. तशीच लगबगीने घरी गेली. शेपटी बरोबर काय मिळाले ते पाहू लागली, काहीतरी बटणाच्या आकाराचे गोल होते. तिने ते शेपटीला लावून पाहिले, डोक्याला लावून पाहिले. वास घेतला. नंतर शेवटी चावून पाहू म्हणून तोंडात टाकले, ते गेले घशात, अन् अडकले. इकडे शेपटी पण छान बसली होती. घशातले बटण काही बाहेर येईना. फक्त कर्कश आवाज येऊ लागला, इतक्या छान शेपटीची ही राजकन्या कर्कश आवाजात ओरडत पळत होती. बटण अडकलंय सांगत होती.

सगळे जण शेपटीचे कौतुक करायचे पण आवाज ऐकून पळून जायचे. जगात असेच विरोधी गुणांचे जीव असतातच. माणसं त्याला अपवाद नाहीत. आपणही सगळे असे विरोधाभास घेऊन हिंडत असतो. जे आपल्याला कधीच कळत नाही. इतरांना मात्र ते जाणवतं.

Advertisement

Advertisement
Tags :

.