‘वन मोबिक्विक’चे समभाग 442 वर सुचीबद्ध
विशाल मेगा मार्टसह साई लाईफ सायन्स यांचेही समभाग सुचीबद्ध
मुंबई :
वन मोबिक्वक, विशाल मार्ट आणि साई लाइफ सायन्स यांचे समभाग 18 डिसेंबर रोजी बुधवारी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. वन मोबिक्विकचे समभाग एनएसईवर 57.7 टक्क्यांच्या प्रीमियमसह 440 वर सूचीबद्ध झाले आहेत. हे बीएसईवर 58.5 टक्क्यांच्या प्रीमियमसह 442.25 वर सूचीबद्ध झाले आहेत. त्याची इश्यू किंमत 279 आहे.
विशाल मेगा मार्टचे शेअर्स एनएसईवर वर 33.3 टक्क्यांच्या प्रीमियमसह 104 वर सूचीबद्ध झाले. त्याच वेळी, बीएसईवर 41.03 टक्क्यांच्या प्रीमियमसह 110 रुपयांवर समभाग सुचीबद्ध झाले. त्याची इश्यू किंमत 78 रुपये होती.
साई लाइफ सायन्सेसचा समभाग 18 टक्क्यांच्या तेजीसह एनएसईवर 650 रुपयांवर सूचीबद्ध आहेत. त्याचवेळी, बीएसईवर 19.7 टक्के प्रीमियमसह 657.25 रुपयांवर समभाग लिस्ट झाले. त्याची इश्यू किंमत 549 रुपये होती.