For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बोरी पुलाची एक लेन आज रात्रीपासून बंद

12:38 PM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
बोरी पुलाची एक लेन आज रात्रीपासून बंद
Advertisement

मडगाव : राष्ट्रीय महामार्ग-17ब वरील बोरी पुलाच्या एका लेनच्या दुऊस्तीचे काम आज शुक्रवार दि. 2 मे पासून हाती घेतले जाणार आहे. हे काम 20 मे पर्यंत चालणार असल्याने रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी ही लेन बंद असणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याने कळविले आहे. बोरी पुलाचे मजबुतीकरण आणि पुनर्वसनाचे काम आज रात्रीपासून हाती घेतले जाणार आहे. बोरी पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने पुन्हा एकदा पुलाचे डांबरीकरण करण्यात येणार आहे, कार्यकारी अभियंता सत्येंद्र भोबे यांनी ही माहिती दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.