For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक रुपयासाठी एक लाख

06:43 AM May 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
एक रुपयासाठी एक लाख
Advertisement

उत्तर प्रदेश या राज्यातील शामली जिल्ह्यातल्या आहता गौसगढ या गावातील महिला प्रधान संगीता रोड यांनी सर्व गावकऱ्यांना एक आव्हान दिले आहे. आपल्या कामात 1 रुपयाचाही घोटाळा आपण केल्याचे कोणी सिद्ध केले, तर त्याला आपण 1 लाख रुपयांचे पारितोषक देऊ, अशी घोषणा या महिला प्रधानाने केली आहे. त्या या गावाच्या महिला प्रधान पाच वर्षांपूर्वी बनल्या. आता त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या प्रसंगी त्यांनी गेल्या पाच वर्षांमधील आपल्या कामाचा संपूर्ण हिशेब गावकऱ्यांसमोर आणि प्रशासनासमोर मांडला आहे. आपण या कालावधीत चुकुनही कधी एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही. कोणीही माझे हिशेब तपासावेत आणि मी घोटाळा केल्याचे सिद्ध करावे. कोणीही माझ्या आर्थिक व्यवहारांमध्ये एक रुपयाचाही घोटाळा शोधून दाखविला, तर मी त्याला एक लाख रुपये पुरस्कार म्हणून देईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. त्यांनी गावात अनेक स्थानी फलक लावून असे आव्हान गावकऱ्यांना दिले आहे. अद्याप त्यांच्या आव्हानाचा स्वीकार गावामधल्या कोणीही केलेला नाही, असे दिसून येत आहे.

Advertisement

मात्र, त्यांना असे आव्हान का द्यावे लागले, हा प्रश्न त्यांना काहींनी विचारला. गावातील काही जणांनी आपल्या ग्रामप्रधान या नात्याने गावात केलेल्या विकास कामांवर केलेल्या खर्चावर आक्षेप घेतलेला होता. काहींनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोपही केला. त्यामुळे आपल्याला असे आव्हान द्यावे लागले. आपला संपूर्ण कार्यकाळ आपण अत्यंत प्रामाणिकपणे कार्य केले. गावाचा विकास मोठ्या प्रमाणात केला. गावासाठी प्रशासनाने दिलेल्या निधीचा पुरेपूर उपयोग विकासासाठी केला. तरीही काही गावकरी आपल्यावर संशय व्यक्त करतात, याचे दु:ख होते. म्हणून. 1 रुपयाचा भ्रष्टाचार दाखवा, 1 लाख रुपये मिळवा ही घोषणा त्यांनी दिली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.