For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यल्लापूर-किरवती तपासनाक्यावर एक लाख 20 हजार रुपये जप्त

10:28 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
यल्लापूर किरवती तपासनाक्यावर एक लाख 20 हजार रुपये जप्त
Advertisement

बेकायदा रक्कम नेत असल्याने कारवाई

Advertisement

कारवार : यल्लापूर विधानसभा मतदार संघातील किरवती (ता. यल्लापूर) तपासणी नाक्यावर शुक्रवारी दुपारी 3 वा. कोणत्याही कागदपत्रांशिवाय वाहतूक करण्यात येत असलेली 1 लाख 20 हजार रुपये इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई एसएसटी पथक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. विश्वनाथ लोकप्पा शेट्टी नावाची व्यक्ती (एमएच 14 जेआर 9755) क्रमांकाच्या वाहनातून पुण्याहून उडपीकडे निघाली होती. हुबळी-अंकोला राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 63 वरील किरवती तपासणी नाक्यावर सदर वाहनाची कसून तपासणी केली असता 1 लाख 20 हजार रुपये आढळून आले. तथापी शेट्टी यांच्याकडे या रकमेसंबंधी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नव्हते. त्यामुळे ती रक्कम जप्त करण्यात आली आणि यल्लापूर उपट्रेझरीत ठेवण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी अज्जप्पा सोगलद यांनी दिली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.