महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचारात एक ठार

06:22 AM Feb 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इंफाळ पश्चिममध्ये कॉलेजबाहेर आयईडी स्फोट, दोघे गंभीर

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

Advertisement

मणिपूरच्या इंफाळ पश्चिम येथील थांगमेईबंद येथील डीएम महाविद्यालयाबाहेर शुक्रवार, 24 फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आयईडी स्फोट झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी राज मेडिसिटी ऊग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते बिष्णुपूर जिह्यातील रहिवासी आहेत. उपचारादरम्यान ओयनमचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलीस अधीक्षक शिवकांत यांच्या नेतृत्वाखाली इंफाळ पश्चिम पोलिसांचे पथक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही. या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.

दरम्यान, इंफाळ पश्चिम जिह्यातील लम्फेलपत येथून हिंसाचाराची आणखी एक घटना समोर आली आहे. युनायटेड कमिटी मणिपूर (यूसीएम) या नागरी समाज संघटनेच्या कार्यालयाला काही अज्ञातांनी आग लावली. रात्री उशिरा इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील एका शाळेच्या प्रशासकीय ब्लॉकमध्ये तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचीही बातमी आहे. अज्ञात लोकांनी कॉम्प्लेक्समध्ये पार्क केलेले एक वाहनही जाळल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

काही दिवसांपूर्वी मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यात सुरक्षा दल आणि जमावामध्ये चकमक झाली होती. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. हिंसक जमावाने शस्त्रे लुटण्याच्या उद्देशाने सुरक्षा दलांच्या दोन वेगवेगळ्या स्थानांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. एका ठिकाणी जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा जवानांनी गोळीबार सुरू केला. गोळी लागल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article