पत्रादेवी चेकपोस्टसमोर भीषण आपघात
एक तरुण मृत्युमुखी : दोन महिला, छोट्या मुलासह पाचजणांची स्थिती चिंताजनक : छोट्या मुलांचा आक्रोश
पेडणे : गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱ्या इको माऊती एम एच. 12 व्ही झेड 6608 या गाडीने पत्रादेवी चेकनाक्यावर तपासणीसाठी थांबलेल्या मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात माऊती कारचालक तसेच त्याच्या बाजूला बसलेला सहप्रवासी गाडीच्या दर्शनी भागात अडकून पडले. इको गाडीचा चक्काचूर झाला. अपघातातील जखमीला बांदा येथे इस्पितळात उपचारासाठी नेले आसता त्यांचा मृत्यू झाला. त्याचे नाव कांतिलाल विठ्ठल शिंदे (47 वर्षे) असून तो पुणे येथील आहे. हा अपघात काल बुधवारी रात्री 8.15 वा. सुमारास घडला. गाडीचा चालक व अन्य दोन महिला तसेच गाडीत असलेली लहान मुलेही गंभीर झाली. त्यांना स्थानिक नागरिक तसेच तोरसेचे माजी सरपंच बबन डिसोझा व अन्य पोलीस कर्मचारी यांनी तातडीने गाडीतून बाहेर काढून ऊग्णवाहिकेने इस्पितळात उपचारासाठी पाठविले. गाडीत अडकलेल्या चालक व पुढे बसलेला सहप्रवाशी हे गाडीत अडकून पडले. पेडणे अग्निशामक दलाच्या जवानाने कटरद्वारे गाडीचा पत्रा कापून त्याला गंभीर अवस्थेत 108 ऊग्णवाहिकेने इस्पितळात नेण्यात आले.
हा अपघात झाल्यानंतर आरोडा ओरड सुरू झाली. अपघात भीषण होता. यावेळी मोठ्या प्रमाणात या गेटकडे लोकांची गर्दी झाली. मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडीही झाली. अनेक लोक यावेळी जमा झाले. बांदा येथील लोकांना माहिती मिळताच तसेच पत्रादेवी येथील लोक धावून आले. मात्र कोणाला काय झाले याचा पत्ताही लागत नव्हता. माऊती इकोचा दर्शनी भाग मालवाहू ट्रकच्य मागून धडक दिल्याने त्याचा चक्काचुरा झाला. मालवाहू ट्रक जी.जे 12 व्हाय. 9786 हा महाराष्ट्रात जाण्यासाठी गेटवर थांबला होता तसेच गोवा मार्गाहून महाराष्ट्रात जात असलेली माऊती इको गाडीने या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यामुळे एकाच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच मोपा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. गाडीतील प्रवाशाना गंभीर इजा झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. राञी उशिरापर्यंत अपघात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव कळले नव्हते.