ओमनीच्या धडकेत करगणीत एक ठार
आटपाडी :
भरधाव वेगाने येणाऱ्या ओमनी गाडीने धडक दिल्याने करगणी येथील महादेव भाऊ दबडे हे ठार झाले. हा अपघात गुरुवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास करगणी ते बनपुरी रस्त्यावर खिलारी वस्ती येथे घडला. या अपघात प्रकरणी विजय पुकळे (बनपुरी) याच्यावर आटपाडी पा†लसात गुन्हा दाखल करण्यात आला.
करगणी येथील महादेव दबडे हे बॉक्सर मोटरसायकल क्रमांक (एम एच 03 यू 1525) वरून बनपुरीकडे निघाले होते. खिलारी वस्ती येते रामेश्वर खिलारी यांच्या घरासमोर बनपुरीकडून करगणीकडे येणारी ओमनी गाडी क्रमांक (एम एच 13 बी एम 22 93)ने दबडे यांच्या गाडीला समोरून जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन महादेव दबडे यांचा मृत्यू झाला.
या अपघाती मृत्यूप्रकरणी मयत महादेव दबडे यांचा मुलगा विशाल दबडे याने आटपाडी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार बनपुरी येथील विजय पुकळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव दबडे यांच्या अपघाती मृत्यूने वराडखडी आणि करगणीवर शोककळा पसरली.