For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुचाकी घसरुन अपघातात एकजण ठार

01:51 PM Feb 25, 2025 IST | Pooja Marathe
दुचाकी घसरुन अपघातात एकजण ठार
Advertisement

सातारा
आदर्की बु (ता. फलटण) गावच्या हद्दीत फलटण ते सातारा जाणाऱ्या रोडवर खटकाळी ओढ्याच्या पुलाजवळ मंगेश जयसिंग भोईटे (वय ४८ रा. हिंगणगाव ता. फलटण) यांची गाडी स्लिप होऊन झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशन येथे कारण्यात आली आहे.
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली माहिती अशी, फलटण सातारा रोडवरील आदर्की ते आळजापूर दरम्यान असलेल्या खटकाळी शिवाराजवळील ओढ्याच्या पुलावर दुपारी पावणेएकच्या सुमारास दुचाकी चालक मंगेश जयसिंग भोईटे हे आळजापूर येथून हिंगणगावकडे जात असताना कुत्रा आडवा आल्याने आपल्या ताब्यातील दुचाकी बजाज प्लॅटिना (एमएच ११ सीडी ४५८३) स्लिप झाल्याने अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी होवून जागीच ठार झाल्याची घटना घडली.
या अपघाताची माहिती शेखर अरविंद भोईटे (रा. हिंगणगाव ता. फलटण) यांनी लोणंद पोलिसात दिली असून सदर घटनेची नोंद लोणंद पोलिसांत करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.