For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार ट्रॅक्टरच्या अपघातात एक ठार; चौघे जखमी ! मयत मूळचा बत्तीस शिराळा येथील

01:37 PM Jun 29, 2024 IST | Abhijeet Khandekar
कार ट्रॅक्टरच्या अपघातात एक ठार  चौघे जखमी   मयत मूळचा बत्तीस शिराळा येथील
Advertisement

जत प्रतिनिधी

कारने नांगरणीच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने कारमधील एक जण जागीच मयत झाला तर चार जण जखमी झाले. ही घटना जत विजापूर मार्गावरील अमृतवाडी फाट्याजवळ जतपासून पाच किलोमीटरवर गुरूवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. मयत राजन युवराज नायकवडी वय 27, रा. ढोलेवाडी ता. बत्तीस शिराळा येथील आहे. हा तरूण जत येथे आशीर्वाद गोल्ड लोन येथे कामाला होता.
अधिक माहिती अशी, मयत राजन युवराज नायकवडी व इतर चार जण त्यांच्या कारमधून जतकडे येत होते. त्यांच्या कारने रस्त्यावर असणाऱ्या पेरणीच्या ट्रॅक्टरला मागुन धडक दिल्याने हा अपघात होऊन एकजण ठार झाला. तर चारजण जखमी झाले. यात दोघांची प्रकृत्ती चिंताजनक आहे. गंभीर जखमी असलेल्या दोघा रूग्णांवर मिरजेच्या सिव्हिल रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोघांच्या वर खाजगी ऊग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement

जखमींची नावे अशी: विजय उर्फ बंडू कृष्णदेव सांगोलकर (वय 45, रा. मंगळवेढा), गणेश गायकवाड (26, रा. आटपाडी), आकाश व्हनमाने (23, रा. सोलापूर), प्रदीप स्वामी 23 रा. जत) अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. कारच्या चालकाने मद्यपान करून गाडी चालवल्याने हा अपघात घडला असावा असा जत पोलिसांचा अंदाज आहे. अधिक तपास जत पोलीस करीत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.