आंबा घाटात ट्रक दरीत कोसळून एक ठार
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर मार्गांवरील आंबा घाटात साखरेचा ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला. महंमद रामशेर ताहीर हुसेन अन्सारी (३६ रा. भोटारावा पोष्ट कर्मा ता. कोंडरमा राज्य झारखंड) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार महंमद रामशेर ताहीर हुसेन अन्सारी हा आपल्या ताब्यातील ट्रकमध्ये (एम एच १० डी टी ४४०९) फलटण येथून साखरेची पोती भरून जयगड येथे जात होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने शुक्रवारी सकाळी ५.४५ वाजता आंबा घाटातील महामार्गाचे काम सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी बंद रोडच्या कडेला असलेल्या दरीत कोसळला. भीषण अपघातात चालक महमंद अन्सारी जागीच ठार झाला. अपघाताचे वृत्त समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, पोलीस निरीक्षक उदय झावरे,साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उप निरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस कर्मचारी तानाजी पाटील यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला, वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.