कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फणसवळेत टेम्पो उलटून एकजण ठार

12:42 PM Apr 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोघाजणांना गंभीर दुखापत : चालकाचा ताबा सुटल्याने अपघात

Advertisement

रत्नागिरी : तालुक्यातील मजगाव-करबुडे मार्गावरील फणसवळे येथे टेम्पो उलटून एकजण ठार तर अन्य दोघाजणांना गंभीर दुखापत झाल़ी ही घटना गुऊवारी दुपारी 3 च्या सुमारास घडल़ी जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. हरी थापा (27, ऱा जाकादेवी रत्नागिरी, मूळ ऱा नेपाळ) असे मृताचे नाव आह़े तर ललित रमते (28) व राजेश छेत्री (28, ऱा दोघेही जाकादेवी-रत्नागिरी, मूळ ऱा नेपाळ) अशी जखमींची नावे आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश गणपत राऊत (30, ऱा वरची निवेंडी, रत्नागिरी) हा लाकडांनी भरलेला टेम्पो (एमएच 08 एपी 2692) जाकादेवी ते रत्नागिरी असा चालवत येत होत़ा

Advertisement

यावेळी त्याच्यासोबत 4 नेपाळी कामगार होत़े राऊत हा दुपारी 3 च्या सुमारास टेम्पो घेवून फणसवळे येथील उतारात आला असता त्याचा गाडीवरील ताबा सुटल़ा राऊत हा टेम्पोवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत असताना टेम्पो रस्त्याकडेला उलटल़ा या अपघातात हरी थापा, ललित रमते व राजेश छेत्री यांना गंभीर दुखापत झाल़ी टेम्पो उलटल्याचा मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतल़ी टेम्पोमध्ये व लाकडांच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांकडून प्रयत्न करण्यात आल़े तासाभराच्या प्रयत्नानंतर ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढले तसेच उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे दाखल केल़े यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हरी थापा याला तपासून मृत घोषित केल़े तर उर्वरित दोघा जखमींवर तातडीने उपचारास सुरुवात केल़ी या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आह़े

Advertisement
Tags :
#accident#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article