Karad : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी खड्यात कोसळून एक जण ठार
पुणे-बंगळूर महामार्गावर दुचाकी अपघात
कराड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाठार (ता. कराड) गावच्या हद्दीत दुचाकी खड्यात कोसळून चालकाचा मृत्यू झाला. तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. छोटन सुभाष राय (वय २७, रा. हवसपूर-पटणा, बिहार) असे ठार झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार राज्यातील छोटन राय याच्यासह अन्य काहीजण कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक येथे वास्तव्यास आहेत. सोमवारी रात्री छोटन याच्यासह अन्य एकजण दुचाकीवरून बेलवडेहून कराडच्या दिशेने येत होते. ते वाठार गावच्या हद्दीत आले असताना अचानक ताबा सुटून दुचाकी महामार्गानजीकच्या कोसळली.
खड्यात त्यामध्ये छोटन याच्यासह त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, छोटन राय याचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.