For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आराम बस उलटून एक ठार, ३८ जखमी

11:00 AM Feb 03, 2025 IST | Pooja Marathe
आराम बस उलटून एक ठार  ३८ जखमी
Advertisement

कांडगव येथील दुर्घटना
मृत व जखमी छत्रपती संभाजीनगर येथील
गोवा येथून सहल आटोपून परतताना घटना
कोल्हापूर :
गोवा येथून सहल आटोपून छत्रपती संभाजीनगरकडे परत निघालेली ट्रॅव्हलस कांडगाव (करवीर) येथे पलटी झाली. यामध्ये १ जण ठार झाला असून ३८ जण जखमी झाले आहेत. अमोल भिसे (वय ४० रा. छत्रपती संभाजीनगर) असे एका मयताचे नावे आहे. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
भागीनाथ मोटे, गायत्री सावंत, श्रद्धा पागिरे, ऊपाली कटारे, सदाशिव बिरादर, हरीओम जयस्वाल, राहुल पुंड, गुलाब पाटील, अमोल भिसे, अमोल डमरे, बाळासाहेब डमरे, सचिन मोरे, कुणाल खंडागळे, चंद्रशेखर गायकवाड, शुभम चव्हाण, तुषार पाखरे, शिवदास पिंपळे, ज्ञानेश्वर तुपे, बळीराम तोडकर, संदीप कवाळे, निलेशकुमार कनोजे, प्रमोद पाटील, अरबाज पटेल, प्रतीक निकम, स्वप्नील गोपनारायण, सचिन बहादुरे, विलास कोल्हे, राकेश समर्थ, समाधान उबाळे, तानाजी लिमकर, सुनील गायकवाड, आदित्य शेंद्रे, संतोष धोंडगे, सुनील देशपांडे, रामेश्वर कोलते, शाहऊख शेख अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी कंपनीचे १४५ कर्मचारी ४ ट्रॅव्हल्स मधून गोवा येथे पर्यटनासाठी गेले होते. गुरुवार (३०) जानेवारी रोजी सकाळी हे सर्व जण छत्रपती संभाजीनगर येथून गोव्याला निघाले. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण गोवा येथे पोहोचले होते. यानंतर तीन दिवस गोवा येथे पर्यटन करुन रविवारी हे सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ४ ही ट्रॅव्हल्स ट्रिप आटोपून पुन्हा छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी निघाले. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कणकवली येथे जेवणासाठी सर्व कर्मचारी थांबले होते. जेवण आटोपून रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास कर्मचारी कोल्हापूर कडे रवना झाले. कोल्हापूर मार्गे हे सर्वजण छत्रपती संभाजीनगरला जाणार होते. सोमवारी सकाळी छत्रपती संभाजीनगरला पोहोचून कामावर जाण्याच्या तयारीत हे सर्वजण होते. चारपैकी तीन ट्रॅव्हल्स पुढे निघून गेल्या होत्या. यापैकी (डीडी ०१ टी ९३३३) नंबरची ट्रॅव्हल्स रात्री १२ वाजण्याच्या सुमारास कांडगांव येथे आली असता, तीव्र वळणावर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने ट्रॅव्हल्स जागेवरच पलटी झाली. ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने मोठा आवाज झाला. यामुळे परिसरातील नागरीक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ बचावकार्य सुरु केले. मात्र ट्रॅव्हल्स पुर्णपणे पलटी झाल्याने बचावकार्यामध्ये अडथळे निर्माण होत होते. स्थानिक नागरीकांनी कटावणी आणी पारेच्या सहाय्याने ट्रॅव्हल्सच्या पुढील बाजूची काच फोडून काही नागरीकांना बाहेर काढले. मात्र आतील बाजूचे प्रवासी सीट खाली अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यामध्ये अडथळे निर्माण झाले. स्थानिक नागरीकांनी या घटनेची माहिती करवीर पोलिसांना दिली. करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. 8 ते 9 प्रवाशांना बाहेर काढून १०८ अॅम्ब्युलन्सने सिपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काही प्रवाशांना खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान सुमारे दोन तासाहून अधिककाळ बचावकार्य सुरु होते.

Advertisement

दोन तास वाहतूक खोळंबली
कोल्हापूर राधानगरी मार्गावर उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि ट्रकची संख्या मोठी आहे. यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. ट्रॅव्हल्स पलटी झाल्यानंतर या मार्गावरील दोनही बाजूची वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती.

स्थानिकांचे बचावकार्यात सहकार्य
घटना घडल्यानंतर परिसरातील स्थानिक नागरीकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅव्हल्स पलटी झाल्यानंतर त्याचे दार लॉक झाले होते. तसेच प्रवाशी आतमध्येअडकले होते. यामुळे ट्रॅव्हल्सची पुढील आणि मागील बाजूची काच फोडून जखमींना बाहेर काढण्यात आले. १०८ अॅम्ब्युलन्समधून सिपीआर आणी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिपीआर रुग्णालयातही डॉक्टरांचे एक पथक तैनात करण्यात आले होते.

Advertisement

दोन वर्षातील तिसरी घटना
कोल्हापूर - राधानगरी रोडवर ट्रॅव्हल्सचा अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या दोन वर्षातील ही तीसरी घटना आहे. २०२२ मध्ये घडलेल्या अपघातामध्ये आईसह मुलीचा मृत्यू झाला होता. तर यानंतर एका घटनेत १६ प्रवाशी जखमी झाले होते. अरुंद रस्ता आणि या मार्गावरील वाढलेली वाहतूक तसेच तीव्र वळणांचा अंदाज न आल्याने अपघातांची संख्या वाढत आहे.

Advertisement
Tags :

.