For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिकारीला गेले , हातातील बंदूकीची गोळी सुटली ; एक गंभीर जखमी

12:22 PM Dec 28, 2024 IST | अनुजा कुडतरकर
शिकारीला गेले   हातातील बंदूकीची गोळी सुटली   एक गंभीर जखमी
Advertisement

पारपोलीतील घटना ; एक पोलिसांच्या ताब्यात

Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

सावंतवाडी तालुक्यातील पारपोली गावात शिकारीला गेलेल्या युवकांच्या टीममधील एका युवकाला त्याच्या चुलत भावाच्या हातातील बंदूकीची गोळी सुटून पायाला व मांडीला जबर जखम झाली आहे. यात कृष्णा अर्जुन गुरव ( वय ३५) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे दाखल करण्यात आले आहे. चुलत भाऊ वेदांत लक्ष्मण गुरव {वय - २२ } याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले असून अन्य संशयित संशयितांचा शोध सुरू आहे असे सावंतवाडी पोलिसांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.