For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad : शंभर टक्के मतदान करणारच ; मलकापुरातील बचत गटाच्या महिलांचा एकमुखी निर्धार

06:44 PM Nov 26, 2025 IST | NEETA POTDAR
karad   शंभर टक्के मतदान करणारच   मलकापुरातील बचत गटाच्या महिलांचा एकमुखी निर्धार
Advertisement

                             महिलांना मतदान जनजागृती उपक्रमातून लोकशाही प्रक्रियेची माहिती

Advertisement

कराड : मलकापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी बचत गटातील महिलांनी १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार केला. निवडणूक प्रशासनाच्या स्वीप पथकाच्या मध्यवर्ती अधिकारी प्रतिभा लोंढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एनयुएलएम अंतर्गत स्थापित बसुंधरा शहर संघामार्फत महिला बचत गटातील सदस्यांसाठी मतदान जनजागृती उपक्रम नुकताच राबवला.

महिलांनी मोठ्या संख्येने निर्भयपणे मतदान प्रक्रियेत भाग घेऊन लोकशाही प्रक्रिया मजबूत करावी, मुक्त निर्भय व पारदर्शक वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी भारतीय व राज्य निवडणूक आयोग कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन प्रतिभा लोंढे यांनी केले.

Advertisement

उपक्रमास सहाय्यक प्रकल्प अधिकारी शाहीन मणेर, विद्या सोरटे, सुनिता ओतारी, शैलजा बुबनाळे, अनिसा नायकवडी, सोनाली पाटील, अमृता भोसले यांचे सहकार्य लाभले हा उपक्रम मलकापूर नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कपिल जगताप, सहाय्यक ज्ञानदेव साळुंखे व अभिजीत ढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. मतदानाची शपथ देऊन उपक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी स्वीप पथकातील सहाय्यक मध्यवर्ती अधिकारी महेंद्र भोसले, गोविंद, पवार, प्रदीप बंडगर व प्रथमेश देवकुळे उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.