For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरकारी कामात अडथळा ; एकास २ वर्षे कारावास

05:55 PM Apr 17, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सरकारी कामात अडथळा   एकास २ वर्षे कारावास
Advertisement

ओरोस । प्रतिनिधी

खारेपाटण बसस्थानकात अडथळा ठरणारे वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याने एसटी वाहकास थप्पड लगावून शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी शरद शंकर गुरव (३५) रा . खारेपाटण ,संभाजीनगर ता. कणकवली याला जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग सूर्यकांत इंदलकर यांनी भारतीय दंड संहिता १८६०चे कलम ३५३, ३३२,५०४ अंतर्गत एकूण २ वर्षे कारावास आणि ९ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली .याप्रकरणी सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद केला .
अधिक माहिती अशी की दिनांक १८ मे २०१९ रोजी एसटी वाहक (फिर्यादी) बुधाजी कासार यांनी बसस्थानकात अडथळा ठरणारी सुमो कार आरोपी शरद शंकर गुरव यास बाजूला घेण्यास सांगितल्याने संतप्त झालेल्या गुरव याने एसटी वाहक बुधाजी कासार रा . माजगाव ता . सावंतवाडी यांना शिवीगाळ करीत हाताच्या थापटाने कानशिलात मारून सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता . एसटी वाहक बुधाजी कासार यांनी या घटनेची फिर्याद कणकवली पोलीस स्थानकात दिल्याने गुन्हयाची नोंद करण्यात आली होती . दरम्यान ,सदर गुन्ह्यात संदीप कोटगी (एसटी चालक ), पद्माकर अवसरे ,वैद्यकीय अधिकारी डॉ . जितेंद्र मांडवरे , आणि तपास अधिकारी पो. उपनिरीक्षक राजवर्धन खेबुडे यांची साक्ष तपासून जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग यांनी शिक्षा ठोठावली आहे .

Advertisement

Advertisement
Tags :

.