चौके - थळकरवाडीत घराला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू
चौके/वार्ताहर
चौके थळकरवाडी येथील घराला आग लागून दिपक सखाराम परब (57) यांचा जळून मृत्यु झाल्याची घटना मंगळवार रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली.या दुर्घटनेमध्ये संपुर्ण घर जळून खाक झाले आहे .ज्यावेळी घराला आग लागली त्यावेळी घरामध्ये श्री.परब हे एकटेच होते.त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे असा परिवार आहे. मंगळवार रात्री 9 च्या दरम्याने ही आग लागली.ही आग एवढी भयानक होती की आग लागल्या लागल्या संपूर्ण घराने पेट घेतला.आग आटोक्यात आणण्यासाठी मालवण येथील अग्निशामक बंबाला बोलविण्यात आले. त्यानंतर अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले.त्यापुर्वी चौके येथील तरूणाने घराला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.त्यामुळे आग लवकरात लवकर आटोक्यात येण्यास मद्दत झाली.यावेळी मालवण पोलिस निरिक्षक प्रविण कोल्हे घटनास्थळी दाखल झाले.आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही.