For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Chandgad News | दोन गव्यांमध्ये 'काटे की टक्कर'; शिंग पायात अडकल्याने एका गव्याचा दुर्दैवी अंत

11:54 AM May 07, 2026 IST | NEETA POTDAR
chandgad news   दोन गव्यांमध्ये  काटे की टक्कर   शिंग पायात अडकल्याने एका गव्याचा दुर्दैवी अंत
Advertisement

                                            चंदगडमध्ये गव्यांची थरारक झुंज;

Advertisement

चंदगड : चंदगड शहराजवळीलरवळनाथ मंदिर परिसरात दोन गव्यांमध्ये झालेल्या तीव्र झुंजीत एक गवा मृत्युमुखी पडल्याची घटना घडली असून, दुसरा गवा जखमी झाला आहे. येथील गडकरी यांच्या शेतात दोन गव्यांमध्ये अचानक झुंज लागली. ही झुंज बराच वेळ सुरू राहिल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. वनविभागाने सुतळीबांम्ब फेकूनही गवीरेड्यांची झुंज सुरूच होती.

झुंजीदरम्यानएका गव्याचे शिंग दुसऱ्या गव्याच्या समोरील डाव्या पायात अडकून त्याचा पाय गंभीर जखमी झाला व मोडल्याची नोंद आहे. जखमी गव्याची प्रकृती झुंजीनंतर अंत्यत खालावली होती.

Advertisement

वन विभागाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून गेल्या चार दिवसांपासून जखमी गव्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करून मृत गव्याचे दफन केले.

Advertisement
Tags :

.