महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘एक देश, एक नागरी संहिता’ लवकरच!

07:10 AM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकेत : शहरी नक्षलवाद्यांपासून सावधानतेचा दिला इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/केवडिया (गुजरात)

Advertisement

देशाचे धर्मनिरपेक्ष स्वरुप अबाधित ठेवण्यासाठी समान नागरी संहिता लागू करण्याची आवश्यकता आहे. लवकरच अशी संहिता देशात आणली जाईल. ‘एक देश, एक नागरी संहिता’ या तत्त्वाशी केंद्र सरकार बांधील आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरामधील केवडिया येथे संचलनाच्या कार्यक्रमात ते भाषण करीत होते. पटेल यांच्या जयंतीचा दिवस ‘एकात्मता दिन’ म्हणून भारतात साजरा करण्यात येतो.

देशातील सर्व नागरिकांना एका नागरी संहितेच्या सूत्रात गुंफणे अत्यंत आवश्यक आहे. तरच सर्वांना समान न्याय देता येईल. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून त्याचे ते स्वरुप टिकणे आवश्यक आहे. समान नागरी संहिता लागू केल्यामुळे भारताची धर्मनिरपेक्षा अधिक सुरक्षित राहील. ‘एक देश, एक ओळखपत्र’, ‘एक देश, एक वस्तूसेवा करयंत्रणा’ इत्यादी एकात्मताभिमुख योजना देशात यशस्वी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे ‘एक देश, एक नागरी संहिता’ही अत्यंत आवश्यक असून केंद्र सरकार त्यासंदर्भात आगत्याने विचार करीत आहे. लवकरच या संबंधीचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी आपल्या भाषणात सूचीत केले.

एक देश, एक निवडणूक

लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या योजनेचाही त्यांनी परामर्श घेतला. या योजनेमुळे देशात लोकशाही व्यवस्था भक्कम होईल. लोकशाही अधिक मजबूत झाल्यास देशाचा विकासही वेगाने होईल आणि स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत भारत एक विकसित देश बनविण्याच्या योजनेला बळ मिळेल. त्यामुळे ही योजनाही लागू करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

काश्मीरमध्ये घटनेचे राज्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली घटना गेल्या साडेसात दशकांमध्ये कधीच काश्मीरमध्ये पूर्णत: लागू झाली नव्हती. मात्र, 2019 मध्ये केंद्र सरकारने या प्रदेशाला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद 370 निष्प्रभ केला. तेव्हापासून जम्मू-काश्मीरमध्ये घटनेचे राज्य ही संकल्पना पूर्णत: लागू झाली आहे. हा महत्त्वाचा अडथळा आम्ही दूर केला, असेही त्यांनी भाषणात स्पष्ट केले.

शहरी नक्षलवाद धोकादायक

शहरी नक्षलवादाचा धोका आपण सर्वांनी ओळखला पाहिजे. ही देशविरोधी शक्ती असून देशाच्या विकासात सर्वात मोठा अडथळा ठरलेली आहे. शहरी नक्षलवाद नियंत्रणात आणण्याच्या दिशेने आम्ही कार्यरत असून जनतेचेही यासाठी सहकार्य मिळत आहे. जनतेचा बुद्धीभेद करणाऱ्या या तत्त्वांना वेसण घालण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

बाह्या आणि अंतर्गत शक्तींचा धोका

देशाला सध्याच्या स्थितीत बाह्या आणि अंतर्गत अशा दोन्ही शक्तीचा धोका आहे. या दोन्ही शक्ती देशाच्या सुरक्षेला बाधा पोहचविण्यासाठी कार्यरत आहेत. देशात अस्थिरता आणि गोंधळ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणे हे त्यांचे ध्येय आहे. सेनादलांमध्येही फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपली कटकारस्थाने पूर्ण करण्यासाठी अशा शक्तींनी केंद्र सरकारविरोधात अपप्रचार चालविला असून जनतेने त्यांच्यापासून सावध रहावे. जनता त्यांना भीक घालणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसवर जोरदार शरसंधान

काँग्रेस पक्षाने त्याच्या शासनकाळात देशातील एकात्मतेची भावना क्षीण केली. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली समाजा-समाजांमध्ये फूट पाडली. केवळ सत्तास्वार्थाचे राजकारण केले. सत्तेसमोर जनहिताला कमी मानले. आमच्या सरकारने मात्र, देश एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला आहे. सुप्रशासन आणि सबका साथ सबका विकास हे आमचे ध्येय असून गेली 10 वर्षे आम्ही केवळ याच मार्गावर वाटचाल केली आहे. विकास हीच आमची प्राथमिकता आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘धर्मनिरपेक्ष नागरी संहिता’

राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही अधिक बलवान करण्यासाठी आम्ही समान नागरी संहिता लागू करण्याचा निर्धार केला आहे. ही संहिता धर्मनिरपेक्ष असेल. त्यामुळे आम्ही तिचा उल्लेख ‘धर्मनिरपेक्ष नागरी संहिता’ असा करत आहोत. या संहितेमुळे सर्वांना, विशेषत: सर्व समाजघटकांमधील स्त्रियांना समान न्याय मिळेल. त्यामुळे ती अत्यावश्यक आहे, असेही प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.

एकात्मता बलवान करणार....

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article