For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेकायदेशीर बंदूक बाळगल्याप्रकरणी दाभोलीत एकावर गुन्हा

12:06 PM May 20, 2026 IST | अनुजा कुडतरकर
बेकायदेशीर बंदूक बाळगल्याप्रकरणी दाभोलीत एकावर गुन्हा
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले पोलिसांना मिळालेल्या दाभोली राजापुरकरवाडी येथे वेंगुर्ले पोलीस पथकाने अचानक टाकलेल्या छाप्यात विवेक अर्जुन राजापूरकर (42) यांचेकडे बेकायदेशीररित्या व विनापरवाना असलेली एक सिंगल बॅरेल ठासणीची बंदूक सापडली. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये विवेक राजापुरकर याचे वर अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.दाभोली राजापूरवाडी येथील विवेक अर्जुन राजापूरकर (42) हे विनापरवाना बेकायदेशीर रित्या सिंगल बँरल ठासणीची बंदूक वापरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवार दि. 18 मे रोजी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रत्यक्ष सहभागात पोलीस हवालदार योगेश सराफदार, स्वप्निल तांबे, मनोज परुळेकर, जयेश सरमळकर, महिला पोलीस गौरी ताम्हणेकर या पोलीस पथकाने पोलीस पथकाने सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अचानक धाड टाकली.

Advertisement

Advertisement
Tags :

.