एक शरीर, दोन शीर
अमेरिकेच्या केप कॉडमध्ये डायमंडबॅक टेरापिनचे एक असे पिल्लू सापडले आहे, ज्याच्या शरीरावर दोन शीर आहेत. ही अत्यंत दुर्लभ विकासाशी निगडित स्थिती आहे. खास बाब म्हणजे या भागात 5 वर्षांमध्ये असे तिसरे कासव सापडले आहे.
अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्सच्या केप कॉडमध्ये सापडलेले अत्यंत दुर्लभ कासव डायमंडबॅक टेरापिन प्रजातीचे आहे. हे कासव वेलफ्लीट भागात एका नेस्टिंग साइटवर मिळाले आहे. या छोट्या कासवाच्या शरीरावर दोन वेगवेगळे शीर आहेत. अशास्थितीला बाइसिफली म्हटले जाते.
या कासवाचे वजन सुमारे 5.1 ग्रॅम आहे. या कासवाला आता केप वाइल्डलाइफ सेंटरमध्ये देखरेखीत ठेवण्यात आले आहे. हे नीटपणे खातेय की नाही आणि दोन्ही शीर शरीरासोबत कशाप्रकारे काम करत आहेत हे तज्ञांकडून पाहिले जातेय. खास बाब म्हणजे मागील 5 वर्षांमध्ये केप कॉडमध्ये असे तिसरे टेरापिन मिळाले आहे.
बाइसिफली एक अत्यंत दुर्लभ स्थिती आहे. कासवाच्या अंड्यांमध्ये पिल्लू विकसित होत असताना ही स्थिती निर्माण होते. प्रारंभी जेव्हा शरीर निर्माण होत असते, तेव्हा शरीराचे दोन हिस्से पूर्णपणे वेगळे होऊ शकत नाहीत. याचमुळे एाक शरीरावर दोन शीर तयार होतात. अशा प्राण्यांमध्ये दोन्ही शीर वेगवेगळ्या प्रकारे काम करू शकतात, परंतु शरीर एकच असते. शरीराच्या आत काही अवयवही देखील जोडलेले असू शकतात. पिल्लाचा विकास कशाप्रकारे झाला यावर ही गोष्ट निर्भर असते.
कोणती समस्या?
दोन शीर असल्याने कासवाला चालण्यात आणि खाण्यावेळी समस्या असू शकते. दोन्ही शिरांना एकाच शरीरासोबत ताळमेळ राखावा लागतो. जर शरीरातील काही अवयव जोडलेले असल्यास त्याच्या प्रकृतीवर प्रभाव पडू शकतो. परंतु हे कासव दीर्घकाळ जिवंत राहण्यावरून आताच काही ठोस निष्कर्ष काढता येणार नाही. तज्ञ सातत्याने त्याच्या प्रकृतीवर नजर ठेवुन आहेत. या कासवाचे खाणे, चालणे आणि वर्तनाचा ते अभ्यास करत आहेत.
डायमंडबॅक टेरापिन
डायमंडबॅक टेरापिन अमेरिकेच्या सागरी किनाऱ्यावरील भागांमध्ये आढळून येणारे कासव आहे. हे खारे पाणीयुक्त दलदलीचे भाग आणि समुद्रानजीक इतर क्षेत्रांमध्ये राहते. याच्या टणक हिस्स्यावर हीऱ्यासारख्या आकृती असतात. याचमुळे याचे नाव डायमंडबॅक टेरापिन पडले आहे. मॅसाच्युसेट्समध्ये या कासवाला थ्रेटेड म्हणजेच धोक्यातील प्रजाती मानले जाते. राहण्याची जागा कमी होणे, रस्त्यांवरील वाहनांखाली येणे, प्रदूषण आणि मासेमारीच्या जाळ्यात सापडण्याच्या घटनांमुळे ही प्रजाती धोक्यात आली आहे.
तापमानाशी निगडित खास बाब
डायमंडबॅक टेरापिनच्या पिल्लांच्या विकासात तापमानाची देखील मोठी भूमिका असते. अंड्याच्या आतील तापमना हे पिल्लू नर असणार का मादी हे निश्चित करण्यास मदत करते. कमी तापमानात नर आणि अधिक तापमानात मादी होण्याची शक्यता वाढते. या दुर्लभ दोन शीरयुक्त कासवावर सध्या तज्ञांची नजर आहे. अशी प्रकरणे वैज्ञानिकांसाठी खास असतात, कारण यातून कासवाच्या शरीराचा विकास कसा होतो आणि कधीकधी यात अशा असामान्य स्थिती का निर्माण होते हे समजून घेण्यास मदत मिळते.
